दरोड्यातील नऊ आरोपींना पोलीस कोठडी
By Admin | Updated: January 14, 2017 04:46 IST2017-01-14T04:46:03+5:302017-01-14T04:46:03+5:30
चाळीस लाख रु पयांच्या दरोड्यातील नऊ आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी

दरोड्यातील नऊ आरोपींना पोलीस कोठडी
अलिबाग : चाळीस लाख रु पयांच्या दरोड्यातील नऊ आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधिश ए. आर. कांबळे यांच्या न्यायालया समोर शुक्र वारी आरोपींना हजर करण्यात आले होते.
गुरु वारी पोलिसांनी अटक केलेले मुनीरा दापोलकर आणि साहिल दापोलकर यांना न्यायालयासमोर हजर केले. आधीच पोलीस
कोठडीत असलेले पोलीस हवालदार रविंद्र राठोड, पोलिस नाईक प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई किशोर खाडे, श्रीधर भोसे, संदीप नागोठणेकर, स्वप्नील नागावकर, ऋ षीकेश सुर्यगंध यांची पोलीस कोठडी संपली होती. त्यांच्यासह मुनीरा दापोलकर आणि साहिल
दापोलकर यांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. साहिलचा गु्न्ह्यात सहभाग नसल्याचे सांगत त्याची आई मुनीरा हिला रडू कोसळले. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)