शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

अ‍ॅलोपेथी उपचारास विरोध करणाऱ्या विधेयकाच्या विरोधात निमाच्या डॉक्टरांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:48 IST

केंद्रात नीती आयोगाद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम विधेयकात बीएएमएस व बीयुएमएस डॉक्टरांच्या अ‍ॅलोपेथी उपचारास विरोध होत असल्याचा आरोप करीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) डॉक्टरांनी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र शासनाच्या विधेयकास विरोध विरोधी दर्शविला आहे.

ठाणे: केंद्रात नीती आयोगाद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम विधेयकात बीएएमएस व बीयुएमएस डॉक्टरांच्या अ‍ॅलोपेथी उपचारास विरोध होत असल्याचा आरोप करीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) डॉक्टरांनी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र शासनाच्या विधेयकास विरोध विरोधी दर्शविला आहे.या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील निमाचे शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते. येथील गडकरी रंगायतनजवळून हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. शासकीय विश्रामगृहाजवळ या मोर्चास अडवण्यात आले. दरम्यान या मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या मागण्यांचे निवेदन देऊन या निमा डॉक्टरांना अ‍ॅलोपेथीच्या उपचारापासून वंचित केल्यास ग्रामीण व गावखेडय़ातील जनतेचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या विरोधात 6 नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा काढणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.गडकरी येथून निघालेला हा मोर्चा तलावपाली, जांभळी नका, टेंभीनाका, कोर्ट नाका येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व निमाचे शशांक चव्हाण, स्वाती शिंदे, राजेंद्र खटावकर यांच्यासह डॉ. जावेद शहजादे, डॉ. कमिल अनसारी, डॉ. मझार अनसारी आदींसह शेकडो डॉक्टर व महिला डॉक्टर या मोर्चात सहभागी होऊन त्यांनी केंद्राच्या विधेयकास विरोध केला आहे. या एनसीआयएसएमच्या विधेयकातील काही अक्षेपार्य मुद्यामुळे भारतीय चिकित्सा पध्दती म्हणजेच आयएसएमच्या डॉक्टराना सक्षम आरोग्य सेवा देण्यास घातक ठरणार आहे. यामुळे विधेयक रद्द करावे, सुमारे 47 वर्षाच्या आयएमसीसीएचा प्रचलित कायदा रद्द करू नये , संपूर्ण इंटीग्रेटेड चिकित्सा पद्धती राष्ट्रीय चिकित्सा पध्दती म्हणून घोषित करावी, या पध्दतीच्या डॉक्टराचे संरक्षण व्हावे आदी विविध मागण्या या डॉक्टरांनी निवेदनाव्दारे केल्या आहेत.