निलेश राणे यांची माघार
By Admin | Updated: August 22, 2014 00:57 IST2014-08-22T00:57:32+5:302014-08-22T00:57:32+5:30
अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणो यांनी मागे घेतला आहे.

निलेश राणे यांची माघार
मुंबई : कोकणातील गुहागार विधानसभा मतदारसंघातून भास्करराव जाधव यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणो यांनी मागे घेतला आहे. नारायण राणो यांना आघाडीत बिघाडी होऊ नये असे वाटत आहे. त्यांना कोणताही त्रस होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही पक्षाविरोधात नाही. राष्ट्रवादीच्या तर अजिबात नाही. मात्न काही व्यक्तींच्याविरोधात आपण संघर्ष करणार असल्याचे सांगत जाधवांच्याविरोधात काम करणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.