नीलेश राणे यांची कारागृहात रवानगी!
By Admin | Updated: May 21, 2016 05:46 IST2016-05-21T05:46:41+5:302016-05-21T05:46:41+5:30
संदीप सावंत मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे शुक्रवारी सकाळी चिपळूण पोलिसांसमोर शरण आले.

नीलेश राणे यांची कारागृहात रवानगी!
चिपळूण (जि. रत्नागिरी) : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे शुक्रवारी सकाळी चिपळूण पोलिसांसमोर शरण आले. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने नीलेश यांची रवानगी जिल्हा विशेष कारागृहात करण्यात आली.
नीलेश राणे यांना चिपळूण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रथमेश रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. या गुन्ह्यात वापरलेली अलिशान गाडी तपासासाठी हवी असल्याचा मुद्दा मांडत पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. राणे यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शविला. मात्र न्या. रोकडे यांनी नीलेश यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
रुग्णालयात दाखल
स्वास्थ्य बिघडल्याच्या कारणावरुन त्यांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डमध्ये एका विशेष खोलीत त्यांना ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>पोलिसांना शरण आल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.