नीलेश राणे रुग्णालयातच

By Admin | Updated: May 22, 2016 03:45 IST2016-05-22T03:45:01+5:302016-05-22T03:45:01+5:30

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण व अपहरणप्रकरणी माजी खा. नीलेश राणे यांना रत्नागिरी

Nilesh Rane is in the hospital | नीलेश राणे रुग्णालयातच

नीलेश राणे रुग्णालयातच

रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण व अपहरणप्रकरणी माजी खा. नीलेश राणे यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डमध्ये एका विशेष खोलीत ठेवण्यात
आले आहे़
राणे यांची न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी रवानगी केल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणे सोमवारी जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे समजते.
चिपळूण न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़ त्यानंतर त्यांनी जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला़ वैद्यकीय तपासणीत त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळून आले़ रात्री त्यांना रक्तदाबाच्या त्रासाबरोबरच छातीत आणि पोटात दुखण्याचा त्रासही होऊ लागला़ (प्रतिनिधी)

Web Title: Nilesh Rane is in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.