हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:44 AM2020-01-21T11:44:53+5:302020-01-21T11:45:12+5:30

नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Nilesh Rane criticizes Shiv Sena on Nightlife | हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

Next

मुंबई : महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा केली. नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'हिम्मत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवून दाखवा', असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईमध्ये नाइटलाइफसाठी आग्रही असलेले आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजपकडून नाइटलाइफला विरोध होत आहे.

निलेश राणे यांनी नाइटलाइफवरून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना आणि आदित्य ठाकरे आग्रही असलेल्या नाइटलाइफचा किती लोकांना उपयोग होणार आहे ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Nilesh Rane criticizes Shiv Sena on Nightlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.