मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप झाल्यानंतर आता या सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री असलेले उदय सामंत त्यांच्या पदवीवरून अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या पदवीवरून उदय सामंत यांना टोला लगावला आहे. कदाचित पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी ज्ञानेश्वरी विद्यापीठातून घेतलेली पदवी ही खोटी असल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटकरून सामंत यांच्यावर टीका केली आहे. ''पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे,''असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
पदवी खरी असेल; पण 'हा' माणूस १०० टक्के बोगस, निलेश राणेंची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:44 IST