शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 13:05 IST

आम्ही आता शरद पवारांचा फोटो वापरत नाही. आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणुन फोटो वापरतो, असा खोचक टोला लगावला. 

बारामतीमध्ये शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बंड पुकारल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी गोटात चिंतेचे वातावरण आहे. यावरून अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची गरज आहे, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. पहिल्या मिटींग मध्ये ८० टक्के कोणी कुठल्या जागा लढवायच्या याचा निर्णय झाला होता. २० टक्के जागांचे वाटप पेंडिंग ठेवलेले आहे. परंतु पुढच्या मिटिंगमध्ये हा निर्णय होईल. हा निर्णय झाला की सगळे जण आपाआपल्या जागा घेतील, असे पवार म्हणाले. 

निलेश लंके शरद पवारांच्या गटात जाणार असल्याचे विचारले असता पवारांनी लंके नाराज असल्याचे मान्य केले. तेथील स्थानिक राजकारणामुळे लंके नाराज आहेत. त्यांच्या सोबत माझे काल बोलणे झाले. त्यांनी आमच्या महायुतीतल्या एका मंत्र्याविरोधात तक्रार केली आहे. या मंत्र्यामुळे अडचणी येत आहेत, त्रास होत असल्याचे सांगितले आहे. यावर मी त्यांना आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तुमच्या येथील मंत्री असे एकत्र येऊन चर्चा करू, काही प्रश्न, त्रास असेल तर आपण सोडवू असे सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले. समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्यामुळे अशा वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचा फोटो वापरत असल्यावरून झापल्याबाबत अजित पवारांना विचारले असता. आम्ही आता शरद पवारांचा फोटो वापरत नाही. आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणुन फोटो वापरतो, असा खोचक टोला लगावला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारVijay Shivtareविजय शिवतारे