निगुडघर-साळव रस्त्याची दुरवस्था

By Admin | Updated: July 4, 2016 01:35 IST2016-07-04T01:35:38+5:302016-07-04T01:35:38+5:30

१५ गावांना जोडणाऱ्या निगुडघर-साळव रस्त्यावरील नीरा नदीवरील पूल ते नीरा देवघर उजव्या कालव्यापर्यंतच्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली

Nigudhar-Salvak road accident | निगुडघर-साळव रस्त्याची दुरवस्था

निगुडघर-साळव रस्त्याची दुरवस्था


भोर : नीरा देवघर धरणातील रिंगरोडवरील १५ गावांना जोडणाऱ्या निगुडघर-साळव रस्त्यावरील नीरा नदीवरील पूल ते नीरा देवघर उजव्या कालव्यापर्यंतच्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यात चिखल, पाणी साचून राडारोडा झाला आहे. या चिखलात गाड्या घसरून पडून अपघात होत आहेत. गेल्या १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास १५ गावांतील सरपंच व ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नीरा देवघर धरणांतर्गत रिंगरोडवरील साळव, रायरी, धारांबे, कंकवाडी, पऱ्हर बु, परहर खुर्द, निवंगण, गुढे, शिरवली हि.मा, माझेरी कुडली बु, कुडली खु, दुर्गाडी, अभेपुरी धानवली या गावांसह भावेखल अंगसुळे,कारी ही गावेही या रस्त्याचा वापर करतात. १९९० साली नीरा देवघर धरणाचे काम सुरू झाले. त्या वेळी धरणाच्या कामासाठी अवजड वाहने घेऊन जाण्यास हा रस्ता बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्याला १५ ते २० वर्षे त्यानंतर कालवाधी झाला; मात्र निगुडघर-साळव रस्त्याची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे निगुडघर गावापासून नीरा नदीवरील पूल ते उजव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याला खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या खचल्याने, तसेच पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या रस्त्याची डागडुजी करावी म्हणून पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही.
बांधकाम विभागाच्या वादात अडकला रस्ता
निगुडघर-साळव हा रस्ता पूर्वी बांधकाम विभागाकडे होता. तो पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग सदरच्या रस्त्याचे काम करीत नाहीत आणि पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने विभागांच्या वादात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Nigudhar-Salvak road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.