न्याहरी योजनेकडे अधिका-यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: September 30, 2014 00:16 IST2014-09-30T00:09:37+5:302014-09-30T00:16:52+5:30
राज्यात ४0 कोटीची उलाढाल; मात्र पर्यटन महामंडळाच्या योजनेपासून लोणार वंचित

न्याहरी योजनेकडे अधिका-यांचे दुर्लक्ष
लोणार (बुलडाणा) : पर्यटन केंद्राचा विकास करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमध्ये न्याहरी योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गंत राज्यात दरवर्षी जवळपास ४0 कोटीची उलाढाल होते; मात्र लोणार पर्यटनस्थळाकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ येथील पर्यटकांना मिळत नसल्याचे दिसून येते.
राज्यातील वाढत्या पर्यटनामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन केंद्रे विकसीत करून, त्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटक संकुलेही उभारण्यात आली. यासोबतच पर्यटकांना तेथील संस्कृती, कला, चालीरिती, परंपरा, राहणीमान याची माहिती व्हावी, पर्यटकांना वातावरणानुसार जेवणाची सुविधा व्हावी, या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पर्यटन क्षेत्राच्या परिसरात बंद असलेली घरे संबंधित घरमालकामार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देऊन, पर्यटकांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य पर्यटन महामंडळाने निवास व न्याहरी योजना कार्यान्वित केली. १0 वर्षापूर्वीच्या या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ४0 कोटीची उलाढाल होते. पर्यटकांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा पाहिजे त्या प्रमाणात प्रसार न झाल्यामुळे लोणारसारखे जागतिक किर्तीचे पर्यटन स्थळ या योजनेपासून वंचित आहे. राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, यात सातारा जिल्हा क्रमांक १ वर आहे. कोकणातही या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पर्यटनस्थळाशी अनुरूप भोजनाचा स्वाद स्थानिक नागरिकांच्या घरी जावून घेता यावा, यासाठी राज्य पर्यटन महामंडळाकडून न्याहरी निवास योजना कार्यान्वित करण्यात आली. दिवसेंदिवस पर्यटनाकडे वाढत चाललेला ओढा लक्षात घेता, पर्यटकांना विनासायास आणि रूचकर भोजन मिळावे, यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली; परंतु पर्यटन महामंडळाच्या अधिकार्यांकडून या योजनेचा पाहिजे त्याप्रमाणात प्रसार न झाल्यामुळे या योजनेच्या लाभापासून जाग ितक किर्तीचे पर्यटनस्थळ असलेले लोणार वंचित आहे.
लोणार हे राज्यातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ असून, येथे येणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी पर्यटनाशी संबंधित प्र त्येक योजना इथे राबविली गेली पाहिजे, जेणे करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे लोणार येथील महाराष्ट्र पर्यटन संकुलाचे संचालक राजेश मापारी
यांनी संचालक, महाराष्ट्र पर्यटन संकुल, लोणार