निदानाचा जीवघेणा काळाबाजार
By Admin | Updated: January 29, 2015 06:32 IST2015-01-29T06:04:34+5:302015-01-29T06:32:53+5:30
आजाऱ़़ याचे उत्तर केवळ निदानातूनच मिळते़ हे निदान करणारा सर्वसामान्य मार्ग म्हणजे रक्त किंवा लघवीची चाचणी़ या चाचणीच्या खोलवर जाण्यात कोणालाही रस नसतो़

निदानाचा जीवघेणा काळाबाजार
टीम लोकमत, मुंबई
आजाऱ़़ याचे उत्तर केवळ निदानातूनच मिळते़ हे निदान करणारा सर्वसामान्य मार्ग म्हणजे रक्त किंवा लघवीची चाचणी़ या चाचणीच्या खोलवर जाण्यात कोणालाही रस नसतो़ रुग्णाला हवे असतात ते केवळ उपचाऱ़़ याच असाहाय्यतेचा गैरफायदा घेत छुपा काळाबाजार सुरू आहे़ या काळाबाजाराचे मूळ आहे पॅथॉलोजी लॅब! कारण या लॅबमध्ये नेमके काय चालते, हे ‘टीम लोकमत’ने शोधले आहे़ त्यातून निदानाआड सुरू असलेले भयाण वास्तव समोर आले़
रक्त, लघवी तपासणी करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेल्यावर गर्दी आहे का? रिपोर्ट लगेच मिळेल का? या सगळ््या गोष्टी आवर्जून पाहिल्या जातात. पण तिथे पॅथॉलॉजिस्ट आहे का, हे किती जण पाहतात़ आजाराचे निदान करण्यासाठी ज्या तपासण्या केल्या जातात, तो ‘रिपोर्ट’ देणारी व्यक्ती कोण, तिचे शिक्षण काय, या बाबी अनेकांना माहीत नसतात. पॅथॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तज्ज्ञ डॉक्टर रिपोर्ट देत नसल्याने रिपोर्ट अनेकदा चुकतात़ यामुळे रुग्णांना चुकीची औषधे दिली जातात आणि हे रुग्णांच्या जिवावर बेतते. ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनमध्ये सात लॅबपैकी एकाच लॅबमध्ये डॉक्टर येत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मुंबईत किती पॅथॉलॉजी लॅब आहेत, याची अधिकृत नोंदणी महापालिका अथवा शासनाच्या कोणत्याच विभागात नाही. पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी ठोस नियमावली नाही़ त्याची नोंद करण्याचे बंधन कायद्यात नाही. यामुळे लॅब टेक्निशियन सर्रासपणे लॅब सुरू करून रुग्णांच्या तपासण्या करण्याचा धडाका लावतात, रुग्णांना रिपोर्ट देतात.
उच्च न्यायालयाने २००७ मध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियनचा (डीएमएलटी) अभ्यासक्रम अथवा तत्सम अभ्यासक्रम केलेल्या व्यक्तींना स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब सुरू करता येणार नाही, असे अंतरिम आदेश दिले होते. पण या आदेशांचेही सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. तपासण्या झाल्यावर टेक्निशियनच रिपोर्ट तपासतो, सही करून देतो, रिपोर्ट करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय ज्ञान नसते. पण या सगळ््या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष करून पॅथॉलॉजी लॅबच्या निदानाचा जीवघेणा काळाबाजार सुरू आहे.