न्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी
By Admin | Updated: October 9, 2015 00:57 IST2015-10-09T00:57:34+5:302015-10-09T00:57:34+5:30
पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन उरण तालुक्यातील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे मुंबई

न्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी
मुंबई : पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन उरण तालुक्यातील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे मुंबई उपनगरातील जनतेला पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
नवी मुंबईतील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेमध्ये सिडको, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, पनवेल नगरपालिका, सेंट्रल रेल्वे, विशेष आर्थिक क्षेत्र व मार्गस्थ गावे, वाड्या यांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. नवी मुंबई परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा करण्यासाठी अस्तित्वातील योजनेच्या बळकटीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
लोहोप येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे, शुद्ध पाण्याची उर्ध्ववाहिनी, प्रक्रियापूर्व पाण्याची पम्पिंग मशीनरी, भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, शुद्ध पाण्याची उर्ध्ववाहिनी व पम्पिंग मशीनरी इत्यादीचा समावेश असणाऱ्या २६० कोटी रुपये किमतीच्या योजनेला मान्यता दिली. यामध्ये सिडको, जेएनपीटी व पनवेल नगरपालिकेसोबत करार करून त्यांच्याकडून लवकरात लवकर निधी जमा होणे अपेक्षित आहे.
(विशेष प्रतिनिधी)