शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, ‘या’ कारणामुळे हरित लवादानं ठोठावला १२ हजार कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 22:11 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला मोठा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तब्बल १२ हजार कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला मोठा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तब्बल १२ हजार कोटी रुपये आहे. पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ अंतर्गत हा दंड ठोठावला आहे. दरम्यान, आता शिंदे सरकारची चिंता वाढली आहे.

हरित लवादाच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय. तसंच महाराष्ट्र सरकार घन आणि द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याचंही यात म्हटलंय. सातत्यानं होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला हा दंड ठोठावला. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासाठी पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची व्यापर पावलं उचलली नसल्याचं निरिक्षण खंडपीठानं नोंदवलंय.

महाराष्ट्र सरकारला द्रव कचरा व्यवस्थापनात चूक केल्याबद्दल १०,८२० कोटी रुपये आणि घनकचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याबद्दल १,२०० कोटी रुपयांचा असा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने दंडाची रक्कम येत्या दोन महिन्यांत जमा करावी आणि ती मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार पर्यावरण रक्षणासाठी वापरली जावी, असे हरित लवादानं म्हटलं आहे.

सुचनाही केल्यापर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर यंत्रणा, गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा, ग्रामीण भागातील गाळ व्यवस्थापन आदींवर निधी खर्च करावा, असंही सुचवण्यात आलं आहे. दुसरीकडे, राज्यात ८४ ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावेत, असं हरित लवादानं म्हटलं आहे. दरम्यान, यावर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेतेय हे पाहावं लागणार आहे. तसंच हरित लवादानं निर्णयामध्ये मुख्य सचिवांची जबाबदारीही निश्चित केली आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असंही सुचवण्यात आलंय.

पश्चिम बंगाल सरकारलाही दंडराष्ट्रीय हरित लवादानं काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल सराकरला ३५०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. पश्चिम बंगाल सरकारलाही घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्याचं सांगत हा दंड ठोठावण्यात आला होता.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र