शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 05:32 IST

आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पुढील तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई बाहेरचे व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता, आता पुढच्या आठवड्यातच विस्तार होण्याची  चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी दुपारनंतर दिल्लीला रवाना झाले. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभ व स्नेहभोजनाला दोघेही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी ते विस्ताराबाबत चर्चा करतील, असे म्हटले जात होते. मात्र, अशी कोणतीही भेट ठरली नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसाची बैठक २३ जुलै रोजी पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते तेथे असतील. २४ जुलै रोजी भाजप व मित्रपक्षांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलविली आहे. त्या बैठकीला शिंदे-फडणवीस हे दोघेही उपस्थित राहतील. 

२५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आणि त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन असे कार्यक्रम दिल्लीत आहेत. त्यावेळी शिंदे-फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे.

अधिवेशन लांबणीवर

मंत्रिमंडळ विस्तार लटकल्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही लांबणीवर पडले आहे. २५ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना खात्याची माहिती घेण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांची पूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार