शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन, नारायण राणेंचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:24 IST

काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र पुढच्या काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन,

मुंबई - काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र पुढच्या काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे म्हणाले, "शिवसेना हा एक नंबरचा घाबरट पक्ष आहे.  मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही." यावेळी नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये आता आक्रमकता उरली नसल्याचा टोला लगावला."काँग्रेसने कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपाचाच विजय होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.  नारायण राणॆंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतची अनिश्चितता अद्याप दूर झालेली नाही. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यानंतर या पक्षाची आगामी वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, अशी भूमिका राणे यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपाप्रणीत एनडीएमध्ये आपला पक्ष सामील करण्याची घोषणा केली होती. दरम्यान,  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. त्या जमिनीवर आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरवर चर्चा करु, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी टाकली होती. भाजपचा एक सदस्य असताना नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिले होते. आता भाजपचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी मैत्री केली तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेची पदे मिळू शकतील, अशी खुली ऑफर आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत शनिवारी दिली आहे. नीतेश राणेंची ऑफर भाजपा स्वीकारणार का? असे पत्रकारांनी प्रमोद जठार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे  मंत्रीपद ही हवेतील चर्चा आहे. ती जमिनीवर येवू दे. त्यानंतरच त्यांच्या ऑफरवर चर्चा करु. आताच त्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले होते.

 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  आठवड्याभरापूर्वी केली होती. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुस्तीही त्यांनी याला जोडली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना