शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता हा चौथ्या स्तंभाचा महत्त्वाचा घटक - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:26 IST

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या, इतके या स्तंभाचे महत्त्व आहे. हा स्तंभ जर इतका महत्त्वाचा असेल तर या स्तंभातील वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन शनिवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते, या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबई : लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या, इतके या स्तंभाचे महत्त्व आहे. हा स्तंभ जर इतका महत्त्वाचा असेल तर या स्तंभातील वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन शनिवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते, या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.फेरीवाला धोरण आले आहे. मात्र फेरीवाला कोण आणि वृत्तपत्र विक्रेते यातील फरक जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर त्याला अर्थ नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऋण माणणाºयांपैकी मी आहे. महापालिका आमच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. उद्या तुम्ही म्हणाल नाराज आहात तर सरकारमधून बाहेर पडा. मात्र विचार करून आपण एक भूमिका घेत असतो. ज्या वेळी भूमिका मांडायची त्या वेळी ती मी घेईनच आणि बेधडकपणे घेईन. वृत्तपत्र वाचण्याची सवय पिढ्यान् पिढ्या तशीच आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व कुणी किती प्रयत्न केला तरी कमी होऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, दांगट न्यूजपेपर एजन्सीचे मालक बाजीराव दांगट, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरी पवार उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र