भाड्याच्या वाहनाने न्यूझीलंडची मुशाफिरी

By Admin | Updated: November 8, 2014 04:00 IST2014-11-08T04:00:42+5:302014-11-08T04:00:42+5:30

टुरबरोबर गेल्यावर देशाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पाहिजे तितका वेळ मिळत नाही. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी स्वत:ची गाडी पाहिजे,

New Zealand's Mushfafiri with the rental vehicle | भाड्याच्या वाहनाने न्यूझीलंडची मुशाफिरी

भाड्याच्या वाहनाने न्यूझीलंडची मुशाफिरी

मुंबई : टुरबरोबर गेल्यावर देशाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पाहिजे तितका वेळ मिळत नाही. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी स्वत:ची गाडी पाहिजे, असे वाटत असले तरी परदेशात प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. मात्र न्यूझीलंडची मुशाफिरी करण्यासाठी पर्यटकांना भाड्यावर वाहने मिळतात. हार्ले डेव्हिडसन बाईकवरून मनसोक्त हिंडण्याचा आनंदही न्यूझीलंडमध्ये लुटता येतो, असे न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितले.
येता वर्ल्डकपचे यजमानपद हे न्यूझीलंडकडे आहे. वर्ल्डकपच्या चार महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटप्रेमी हजारोंच्या संख्येने न्यूझीलंडमध्ये नक्कीच दाखल होणार. मात्र, इतर वेळीही निसर्गसौंदर्य, अ‍ॅडव्हेंचर आणि आरामदायी सुटी घालवण्यासाठी अनेक जण न्यूझीलंडचा पर्याय निवडतात. भारतातून दरवर्षी सुमारे ३५ हजार पर्यटक हे न्यूझीलंडला भेट देतात. क्वीन स्टॅण्ड हे अत्यंत सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. या एका पर्यटनस्थळावर अनेक अ‍ॅडव्हेंचरचा अनुभवदेखील पर्यटकांना घेता येतो, असे न्यूझीलंड टुरिझमचे आशिया जनरल मॅनेजर डेव्हीड क्रेग यांनी सांगितले. अ‍ॅडव्हेंचर टूर करण्यासाठी देखील न्यूझीलंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
या देशात अनेक ठिकाणी वॉटर राफटिंगसारखे साहसी खेळ अनुभवता येतात. न्यूझीलंड येथील हॉकलंड परिसरात ४५ कि.मी.चा त्रिकोणी प्रदेशही अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. भारतीय पर्यटकांना न्यूझीलंडपर्यंतचा प्रवास सोपा व
सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनस्थळांची जाहिरात जागतिक स्तरावर केली जात असल्याचे फ्लेमिंग यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: New Zealand's Mushfafiri with the rental vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.