शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नववर्षाचे स्वागत: पारंपारिक वेशभुषा केलेल्या महिला भगिनींनी वेधले लक्ष

By admin | Published: March 28, 2017 2:51 PM

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीतर्फे मंगळवारी सकाळी ७ वाजता राजराजेश्वराचे पूजन करून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 28: गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीतर्फे मंगळवारी सकाळी ७ वाजता राजराजेश्वराचे पूजन करून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रस्थानी पारंपारिक वेशभुषा आणि केसरी फेटे परिधान केलेली मातृशक्ती होती. शहरातुन निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे शहरात ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संस्थांनी स्वागत केले.

गुढीपाडव्यानिमित्त संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी मोटारसायकल रॅली काढण्यात येते. यंदाही मोटारसायकल रॅली राजराजेश्वर मंदिर येथुन काढण्यात आली. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, माजी महापौर उज्वला देशमुख, रा.स्व. संघाचे नगर संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, विप्लव बाजोरिया बाबासाहेब पाठक, गोपाल खंडेलवाल, शंतनु जोशी यांच्या प्रमुख उपस्थित मोटारसायकलीस प्रारंभ झाला. मोटारसायकलवर भगवे ध्वज हातात घेऊन आणि केसरी फेटे परिधान केलेले तरूणी, तरूणी, मातृशक्ती, ढोलताशांच्या गजरात निघाले. मोटारसायकल रॅलीच्या समोर भगव्या ध्वज आणि पताकांनी सजविलेला रथ होता.

ही रॅली टिळक रोड, जैन मंदिर, गांधी रोड, पंचायत समितीसमोरून, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे अशोक वाटीका, मुख्य डाकघर, रालतो विज्ञान महाविद्यालय, अमानखॉ प्लॉट, रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ चौक, सातव चौक मार्गाने मार्गक्रमण करीत बिर्ला राम मंदिरात पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. मोटारसायकल रॅलीमध्ये पवन केडिया, प्रा. विवेक बिडवई, मोहन गद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, हरिश आलिमचंदानी, नगरसेवक राजेश मिश्रा, यांच्यासह इंद्राणी देशमुख, वैजयंती पाठक, शारदा बियाणी, चित्रा बापट, नगरसेविका किरण बोराखडे, गीतांजली शेगोकार, मनिषा भंसाली, कविता फाटे, भारती निम, आरती घोगलिया, डॉ. अशोक ओळंबे, दीपक मायी, प्रकाश घोगलिया, आशिष भिमजियानी, डॉ. प्रशांत मुळावकर, अजय शर्मा, डॉ. हेमंत जोशी, नरेंद्र राठी, नरेंद्र तापडिया, समीर गडकरी, मनिष शार्दुल, विष्णुपंत गुल्हाने, डॉ. तुषार वोरा, डॉ. राम हेडा, नरेश बियाणी, केशव खटोड, रमेश चांडक, विष्णु खंडेलवाल, प्रा. डॉ. विजय नानोटी, प्राचार्य सिकची, प्रा. श्रीप्रभु चापके, जगदिश मुंदडा, अतुल पिलात्रे, अनिल राठी, विजय पनपालिया, अनिल तापडिया सहभागी झाले होते. संकल्प प्रतिष्ठानच्या ढोलताशांचा गजरमंगलदिनी रॅलीमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या कलावंतांनी सहभाग घेत, ढोलताशे वाद्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. रॅलीमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या ढोलताशांच्या गजराने, आसमंत निनादुन गेला होता. मोटारसायकल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत रॅलीचेराममंदिर संस्थान, राणीसती धाम मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रालतो विज्ञान महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रॅलीचे स्वागत केले. सिव्हील लाइन चौकात माजी नगरसेवक विजय जयपिल्ले यांनी, अमानखॉ प्लॉट येथे नगरसेवक आशिष पवित्रकार, रश्मि अवचार यांनी स्वागत केले. तसेच खंडेलवाल युवा संघटना, बारा ज्योर्तिलिंग मंदिराचे अध्यक्ष महादेवराव राऊत यांनी स्वागत केले. सातव चौकात नगरसेविका गितांजली शेगोकार, अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी स्वागत केले. बिर्ला रोडवर राष्ट्रसेविका समिती, जलाराम मंदिर संस्थानतर्फे स्वागत करण्यात आले.व्हिडिओ,प्रवीण ठाकरे