शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ ई-बसला मार्गावर धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 11:46 IST

पहिल्या टप्प्यात पुण्यातून सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन..

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेतील दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासाठी २४० ई-बसला मंजुरी

पुणे : मागील वर्षी जुन महिन्यात घोषणा करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या ई-बसला मार्गावर धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातून सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण अद्याप चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामही सुरू झालेले नाही. पुण्यातील हे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून ते पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागु शकतो.केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेतील दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासाठी २४० ई-बसला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच केली. त्यापैकी १०० ई-बस एसटी महामंडळाला मिळणार आहे. मागील वर्षीही या योजनेमध्ये एसटीला ५० बस मिळाल्या आहेत. या बस प्रमुख शहरांना जोडण्यासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये ‘शिवाई’ असे ई-बसचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावर या बसची चाचणीही घेण्यात आली. पण त्याला मंजुरी मिळण्यास विलंब लागला. तर हिरवा कंदील मिळाल्यानंतर दीड-दोन महिन्यांतच लॉकडाऊन जाहीर झाल्याने बससेवाच ठप्प झाली.पहिल्या टप्प्यातील ५० बसपैकी २५ बस पुण्याला मिळणार होत्या. तर उर्वरीत सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिकला देण्यात येणार होत्या. या बस मार्गावर धावण्यासाठी पाचही ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे आवश्यक आहे. पुण्यात स्वारगेट येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. लॉकडाऊनपुर्वी त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार जुनमध्ये बस मार्गावर धावल्या असत्या. पण लॉकडाऊनमध्ये काहीच काम झाले नाही. याठिकाणी महावितरणकडून उच्चदाब क्षमतेची भुमिगत वीजवाहिनी टाकून दिली जाणार आहे. या कामांसह चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. पण अद्याप कोणतेच काम सुरू झालेली नाही. त्यामुळे ई-बस धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.-----------------------फेम इंडिया योजनेअंतर्गत फेज दोनमध्ये महाराष्ट्राच्या वाट्यालला २४० ई-बस आल्या आहेत. त्यापैकी १०० बस एसटी महामंडळाला मिळणार आहेत. तर १०० बस नवीन मुंबई महापालिका आणि ४० बस मुंबईतील बेस्टला मंजुर झाल्या आहेत. देशात सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. तर ४३० बस गोवा, गुजरात व चंदीगढ या तीन राज्यांमध्ये विभागून देण्यात आल्या आहेत.------------

--

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार