शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वाहन नोंदणी शुल्क महागणार : अधिसुचना प्रसिध्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:08 IST

रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. २४ जुलै रोजी नवीन शुल्क रचनेची अधिसुचना काढली आहे

ठळक मुद्देदुचाकीचे शुल्क २०० रुपयांवरून एक हजार रुपये तर कारचे शुल्क ६०० रुपयांवरून ५ हजार

पुणे : नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. दुचाकीचे शुल्क २०० रुपयांवरून एक हजार रुपये तर कारचे शुल्क ६०० रुपयांवरून ५ हजार करण्यात आले आहे. याबाबतची अधिसुचना नुकतीच प्रसिध्द केली असून नवीन शुल्काबाबत सुचना मागविल्या आहे. दरम्यान, या वाढीव शुल्कावर वाहतुकदारांनी नाराजी व्यक्त केली असून गुरूवार (दि. १) पासून राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. २४ जुलै रोजी नवीन शुल्क रचनेची अधिसुचना काढली आहे. यामध्ये सुचविण्यात आलेल्या बदलांवर पुढील ३० दिवसांत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर नवीन बदलांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कासह, जुन्या वाहनांची नोंदणी, हस्तांतरण, योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण याचा समावेश आहे. नवीन दुचाकी वाहनांना नोंदणीसाठी सध्या २०० रुपये तर तीनचाकी वाहनांना एक हजार रुपये आणि चारचाकी वाहनांना ६०० रुपये शुल्क आकारले जाते. पण त्यामध्ये अनुक्रमे १ हजार आणि ५ हजार रुपये वाढ सुचविली आहे. प्रवासी व माल वाहतुक करणाºया वाहनांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुक करणाºया कारचे शुल्क १ हजार वरून १० हजार रुपये तर माल वाहतुक करणाºया जड वाहनांचे शुल्क दीड हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १५ वर्षांपुढील प्रवासी वाहनांना प्रत्येक सहा महिन्यांनी नोंदणी करावी लागणार आहे. नुतणीकरणाचे शुल्क प्रस्तावित नोंदणी शुल्काच्या दुप्पट राहणार आहे. त्यामुळे प्रवासी व माल वाहतुकदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.----------------सध्याचे व प्रस्तावित नोंदणी शुल्क (रुपयांत) -वाहन प्रकार    सध्याचे शुल्क    प्रस्तावित शुल्कदुचाकी    २००        १,०००तीनचाकी    १,०००        ५,०००कार (खासगी)    ६००        ५,०००कार (प्रवासी)     १,०००        १०,०००जड वाहने    १,५००        २०,०००-----------------------------------प्रस्तावित शुल्कवाढीमुळे सर्वसामान्यांसह माल वाहतुकदारांचे कंबरडे मोडणार आहे. मागील पाच वर्षात केंद्र सरकारने विविध प्रकारे वाहतुकदारांवर आर्थिक भार टाकला आहे. विविध निर्णय लादले जात आहेत. त्याला वाहतुकदारांकडून विरोध होत आहे. प्रस्तावित शुल्कवाढीलाही विरोध करणार असून गुरूवारपासून राज्यात आंदोलन सुरू केले जाणार आहे. - बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतुक संघटना

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीस