शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एसटी कर्मचा-यांना मिळणार नवीन गणवेश, ३१ विभागीय कार्यालयांत वितरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 22:39 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने राज्यातील एसटी कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ६ जानेवारीला मुंबई मुख्यालयासह राज्यातील ३१ विभागीय कार्यालयांत कर्मचा-यांना नवीन तयार गणेवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण होणार आहे.  

संदीप मानकर 

अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने राज्यातील एसटी कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ६ जानेवारीला मुंबई मुख्यालयासह राज्यातील ३१ विभागीय कार्यालयांत कर्मचा-यांना नवीन तयार गणेवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण होणार आहे.  

नवीन वर्ष हे राज्य मार्ग परिवहन विभागाच्या परिवर्तनाचे असून या वर्षात कार्यान्वित होणा-या विविध प्रवासी व कर्मचारीभिमुख योजनांमुळे बससेवेचा कायापालट झालेला दिसेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले. ६ जानेवारीला मुंबई सेंट्रल मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला परिवहनमंत्र्यांसह  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. या ठिकाणी एकाच वेळी इतर ३१ विभागांत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत गणवेश वाटप होणार असल्याचे एसटी महामंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात  म्हटले आहे.  

गणवेश ही संस्थेची प्रतिष्ठा असते. कर्मचा-यांनी गणवेश परिधान केलेल्या गणवेशातून संस्थेप्रती अभिमान प्रकट होतो. एसटी महामंडळाचे विविध १६ संवर्गात १ लाख ५ हजार कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिला जात असे. कापड पसंत न पडल्यास आपल्या सोईने कर्मचारी गणवेशाचे खाकी रंग कोणता? हे ओळखणे अवघड होत असे. एकाच पदावर काम करणाºया अनेक कर्मचा-यांना गणवेशात रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्य दिसून येत असे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचा-यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली होती. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता राज्यात सर्व विभागात एकाच वेळीस गणवेश वाटप सोहळा पार पडणार आहे.  श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती विभाग - कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचे आदेश धडकले असून ६ जानेवारीला अमरावती विभागातही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ