योगेश पांडेनागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समापन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार असल्याने, देशभरातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, काँग्रेसशी संबंधित मोठी व्यक्ती संघाच्या कार्यक्रमांत किंवा शिबिरामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन, जयप्रकाश नारायण यांनीदेखील संघस्थळी येऊन भेटी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.संघाची स्थापना झाल्यानंतर नऊ वर्षांनी १९३४ रोजी महात्मा गांधी यांनी वर्धा येथे संघ शिबिराला भेट दिली होती. १४ सप्टेंबर १९४७ रोजी त्यांनी दिल्ली येथे सुमारे ५०० स्वयंसेवकांच्या बैठकीला संबोधितदेखील केले होते. सुभाषचंद्र बोस यांनी २० जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांची भेट घेतलीहोती.विशेष म्हणजे, प्रणव मुखर्जी राष्ट्रपतिपदावर असताना २०१७ साली त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना विशेष भोजनासाठी निमंत्रितदेखील केले होते व दोघांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली होती.स्वातंत्र्यानंतरदेखील काँग्रेसचे अनेक नेते संघस्थानी येऊन गेल्याचे दाखले उपलब्ध आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन, जयप्रकाश नारायण यांचा त्यात समावेश आहे. १९५९ साली जनरल करिअप्पा हे मंगलोर येथे संघ शाखेच्या उत्सवात सहभागी झाले होते. १९६३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संघ स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथे परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते व तीन हजार स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात पथसंचलन केले होते.संघात सर्वांचाचआदर - नरेंद्र कुमारकाँग्रेसचे नेते संघाच्या कार्यक्रमांना येणे ही नवीन बाब नाही. संघात सर्वांचाच आदर होतो. यंदा आम्ही डॉ. प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केले व त्यांची महानता आहे की त्यांनी त्याचा स्वीकार केला.- नरेंद्र कुमार,अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख
संघाला नवीन नाही काँग्रेस नेत्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:46 IST