मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी नवीन वेळापत्रक
By Admin | Updated: October 1, 2015 03:20 IST2015-10-01T03:20:20+5:302015-10-01T03:20:20+5:30
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १ आॅक्टोबरपासून या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येईल

मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी नवीन वेळापत्रक
मुंबई : पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १ आॅक्टोबरपासून या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मेल-एक्सप्रेस गाड्याची वेगमर्यादा वाढवल्याने या गाड्यांचा प्रवास किमान पाच मिनिटे ते अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे.
नागपूर ते कोल्हापूर एक्सप्रेसची १५ मिनिटे, वेरावळ ते पुणे एक्सप्रेसची (लोणावळा ते पुणे) पाच मिनिटे वाचतील, तर भुज ते पुणे एक्सप्रेसच्या वेळेतही पाच मिनिटांची बचत होणार आहे. काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले असून, यामध्ये अहमदाबाद ते पुणे एक्सप्रेस, पंढरपूर-सीएसटी फास्ट पॅसेंजर, साईनगर शिर्डी-सीएसटी फास्ट पॅसेंजर, वेरावळ-पुणे एक्सप्रेस आणि निझामाबाद-पंढरपूर गाडीचा समावेश आहे.