शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपद सोडतीत नव्या नियमाने बदलले गणित; आरक्षण प्रक्रियेला वादाचे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 05:41 IST

उद्धवसेना, काॅंग्रेसचा तीव्र आक्षेप; चिठ्ठ्या न टाकता मराठी वर्णमालेनुसार महापालिकांच्या नावांचा क्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील २९ महापालिकांमधील महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पार पडली. यावेळी नियम डावलून आरक्षण काढल्याचा आक्षेप घेत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. तसेच या प्रक्रियेवर बहिष्कार टाकत ते सर्व सभागृहाबाहेर पडले.

ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण काढताना ते चिठ्ठ्या टाकून न काढता मराठी वर्णमालेनुसार महापालिकांच्या नावांचे क्रम लावून काढण्यात आले. याला उद्धवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी तीव्र आक्षेप घेतला. मात्र ही सर्व प्रक्रिया नियमानुसार सुरू असून  आक्षेपांना नंतर उत्तर दिले जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. 

एसटीचे आरक्षण मुंबईत का नाही?

मुंबईसाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण झाले असते तर अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असती. कारण एसटी प्रवर्गातून निवडून आलेले दोन उमेदवार हे फक्त उद्धवसेनेकडेच होते. त्यामुळे उद्धवसेनेचा महापौर मुंबईत होऊ शकला असता. उद्धव ठाकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचा महापौर होईल, असे म्हटले होते. त्याला या शक्यतेचाच आधार देण्यात येत होता. मात्र तीन किंवा अधिक नगरसेवक एसटी प्रवर्गाचे असतील तरच त्याचा सोडतीत विचार होऊ शकतो असा नियम असल्याने मुंबई या आरक्षणातून बाहेर गेले.

१५ शहरांत महिलाराज

  • अनुसूचित जमाती : कल्याण-डोंबिवली
  • अनुसचित जाती : ठाणे 
  • अनुसूचित जाती महिला : जालना आणि लातूर
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला
  • सर्वसाधारण : छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर
  • सर्वसाधारण महिला : पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मिरा- भाईंदर, नागपूर, नाशिक

हे नियमही महत्त्वाचे

सर्वसाधारण महिलांसाठी महापौरपद आरक्षित असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गाची महिला महापौर होऊ शकते.महापौरपद एखाद्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल तर तिथे खुल्या प्रभागातून निवडून आलेल्या त्या प्रवर्गाचा नगरसेवकही महापौर होऊ शकतो.

उद्धवसेनेकडून निषेध अन् प्रक्रियेवर बहिष्कार

सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार सोडत काढण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींवर अन्याय केला आहे. एसटी प्रवर्गाचे आमच्याकडे दोन नगरसेवक होते. पण तीनपेक्षा जास्त एसटीचे नगरसेवक असतील तरच आरक्षणात विचार होईल असा नवा नियम तयार करण्यात आला. २०१७, २०१९ ला मुंबईत खुल्या प्रवर्गाचा महापौर होता. मग ओबीसीचे आरक्षण काढताना चिठ्ठ्या टाकून ओबीसीचे आरक्षण का काढले नाही, असे सवाल उद्धवसेनेच्या गटनेत्या  किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले.

आरक्षण सोडतीत ‘फिक्सिंग’

महापौर आरक्षण सोडत पूर्णतः पारदर्शक नाही. यामध्ये फिक्सिंग झालेली आहे. भाजपने आपल्या सोयीनुसार आरक्षण केले आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केला.

प्रक्रिया नियमानुसारच

उद्धवसेनेने मुंबईच्या सोडतीबाबत आक्षेप घेतला. मात्र नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या,“सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडली. त्यांना त्यांच्या सोयीचे आरक्षण हवे होते त्यासाठी त्यांनी आरडाओरडा केली.”

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor post lottery changes spark controversy over new rules.

Web Summary : New rules in mayor post lottery stirred controversy. Uddhav Sena protested, alleging rule violations during OBC reservation process, favoring specific parties. Congress alleged 'fixing' in reservations.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mayorमहापौर