शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी! चंद्रशेखर बावनकुळेंनी तीन समित्यांची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 19:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, रवींद्र चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी (२८ डिसेंबर) केली. प्रदेश संघटन पर्व समिती, प्रदेश अनुशासन समिती आमि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली. यात प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली.

प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे