शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 06:00 IST

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २२ जून २०२२ नंतर झालेल्या उलथापालथीनंतर  न्यायालयीन लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी अशा तब्बल दीड वर्ष चाललेल्या शिवसेना प्रकरणावर बुधवारी अंतिम निकाल येणार आहे. हा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मात्र, हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर सरकारला निर्धोकपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाता येईल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्ष कुणाचा आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा आल्याने ते न्यायालयीन लवादाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना निष्पक्षपातीपणे निकाल द्यावा लागणार आहे. सुमारे चार महिने चाललेल्या मॅरेथाॅन सुनावणीनंतर हा निकाल लागेल.

हे प्रकरण इथेच संपणार नाही : अनिल परब

  • अपात्र कुणाला करायचे हा अधिकार अध्यक्षांना आहे. अध्यक्ष कुणाला अपात्र करतात, याची वाट पाहतोय. कारण, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल. कदाचित आमदारांना अपात्र केले तर शिंदे गट न्यायालयात जाईल.
  • आम्हाला अपात्र केलं, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. याचा अर्थ हे प्रकरण इथेच संपत नाही. निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे, अशी टिप्पणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली.

ट्रिपल टेस्टचा आधार घेणार का?

  • निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, यावेळी ग्राह्य धरलेली ट्रिपल टेस्ट, याचाच आधार जर विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे. 
  • ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्या दिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा विचार करूनच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार असून हा निकाल खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या निकालाचे दाखले यापुढे होणाऱ्या प्रत्येक सत्तासंघर्षात प्रमाण ठरणार आहेत.

पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर : पृथ्वीराज चव्हाण

पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे. ते यातून अंग काढून घेण्याचीही शक्यता आहे. कारण कुणी म्हणतात राजीनामा देतील, कुणी म्हणतो आजारी पडतील, कुणी म्हणतो वेळ वाढवून मागतील. त्यांनी जर त्यातून अंग काढले आणि निर्णय घेतला नाही, तर मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पहिला निर्णय घ्यावा लागेल. तो पहिला राजकीय भूकंप असेल, अशी शक्यता काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे.

तेव्हा ठाम होतो, आता बोलणार नाही : नरहरी झिरवळ

आमदार अपात्रतेशी माझा काय संबंध? आधी मी ठाम होतो, पण तेव्हा मी तिथे महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो; परंतु आता मी तिथे नाही, त्यामुळे आता मी यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRahul Narvekarराहुल नार्वेकर