शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरज भासल्यास बैलगाडा शर्यतीसाठी नवा कायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:52 IST

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार : शर्यत आणि सरावाबाबत महिनाभरात मार्ग काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  बैलगाडी शर्यत आणि शर्यतींच्या सरावासाठी संविधान आणि घटनेचा आदर करत कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासंदर्भात महिनाभरात योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे त्यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच गरज भासल्यास यासाठी नवीन कायदा करण्याचाही सरकारचा विचार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह विविध संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयातील त्रिमूर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपरे यांच्यासह राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री केदार म्हणाले की, राज्यात बैलगाडी शर्यतीची सांस्कृतिक परंपरा आहे. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.

याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येईल. राज्यात खिलार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

कायदा सल्लागारांची मदतखिलार बैल शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदाशीसाठीही महत्त्वाची आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार आहे.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतSunil Kedarसुनील केदार