शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भालचंद्र मुणगेकर यांची शोषितांसाठी नवी इनिंग

By admin | Updated: July 21, 2016 05:19 IST

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी परळ येथील दामोदर सभागृहात ‘समता अभियान’ या सामाजिक जनसंघटनेची स्थापना केली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी परळ येथील दामोदर सभागृहात ‘समता अभियान’ या सामाजिक जनसंघटनेची स्थापना केली. याच ठिकाणी ९२ वर्षांपूर्वी म्हणजेच २० जुलै १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या सामाजिक संघटनेची स्थापना करत आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात केली होती. स्थापना अधिवेशनात राज्यातील सर्व विभागांतील दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम, शेतमजूर, महिला, सफाई कामगार, गरीब शेतकरी यांचे ५००हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ओबीसी मुस्लिम संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी, हबीब फकीर, परीट समाजाचे नेते विनायक पाटील, काका क्षीरसागर, सफाई कामगारांचे नेते सुनील चौहान, प्रा. आशालता कांबळे, डॉ. जगन कऱ्हाडे, डॉ. विलास आढाव असे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी समता अभियानाची तात्त्विक आणि वैचारिक भूमिका विषद केली. आजच्या बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक वातावरणामध्ये दलित, शोषित, वंचित अशा सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन संघटितपणे आवाज उठवल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, असे मुणगेकर यांनी सांगितले. या अधिवेशनात सामाजिक समतेची व अभियानाची उद्दिष्टे व घटना सर्वानुमते मंजूर करण्यात आली. त्यानंतर अधिवेशनात १० महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, भटक्या आणि विमुक्त जमातीसाठी लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करणे, जातीचा दाखला देण्याची पद्धत सुटसुटीत करून जात पडताळणीचा कायदा रद्द करणे, अनूसुचित जाती आणि जमातींसाठी खास तरतूद केलेल्या निधीचा पूर्ण विनिमय करून तो इतरत्र न वळवणे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी हा दिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करणे, अनूसुचित जाती-जमाती-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यासाठी असलेल्या राखीव जागांची पूर्णपणे अंमलबजावणी करून अनुशेष भरून काढणे हे महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. नाममात्र शुल्क भरून या जनसंघटनेत ३१ डिसेंबरपर्यंत किमान १ लाख प्राथमिक सभासद आणि १० हजार प्रतिनिधी सभासद करण्याचा संकल्प डॉ. मुणगेकर यांनी यावेळी सोडला आहे. (प्रतिनिधी)