आरटीओमध्ये नवीन परीक्षा प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:50 IST2016-10-18T03:50:29+5:302016-10-18T03:50:29+5:30

शिकाऊ वाहन परवान्यांच्या (लर्निंग लायसन्स) नव्या परीक्षा पद्धतीचे उद्घाटन कोकण विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या हस्ते सोमवारी झाले

New examination system in RTO | आरटीओमध्ये नवीन परीक्षा प्रणाली

आरटीओमध्ये नवीन परीक्षा प्रणाली


ठाणे : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकीच्या शिकाऊ वाहन परवान्यांच्या (लर्निंग लायसन्स) नव्या परीक्षा पद्धतीचे उद्घाटन कोकण विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी चार बॅचमधील १२० पैकी ७० ठाणेकर ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
येथील तीनहातनाक्याजवळील या प्रादेशिक परिवहन कार्यालयात या परीक्षेसाठी स्टॉल सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. पूर्वी एका बॅचमधील परीक्षार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील २० प्रश्न दिले जायचे. त्यापैकी १२ गुण मिळवणारे उत्तीर्ण होत होते. शिवाय, एका बॅचमधील सर्वच परीक्षार्थ्यांना सारखीच प्रश्नपत्रिका असायची. त्यामुळे प्रश्न आणि उत्तरे एकमेकांमधून फुटण्याची शक्यता असायची. आता एका बॅचमध्ये ३० परीक्षार्थी असून प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असेल. १५ पैकी ९ गुण मिळवणारे यात उत्तीर्ण होणार आहेत. ठाण्यात यापुढे दुचाकीच्या शिकाऊ परवान्यांसाठी स्टॉल सिस्टीमवर परीक्षा देणे बंधनकारक असेल. या परीक्षेचा निकाल अवघ्या १० मिनिटांमध्ये परीक्षार्थ्यांना टपालाऐवजी हातात मिळणार आहे.
>अशी मिळवा अपॉइंटमेंट
शिकाऊ लायसन्सच्या अपॉइंटमेंटसाठी सारथी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा. ही प्रणाली राज्यात ठाण्यासह काही ठिकाणी सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने ती राज्यभर सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: New examination system in RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.