शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत

By नारायण जाधव | Updated: August 25, 2022 15:44 IST

दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाच्या ठरावाची वा भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत चार प्रश्न विचारून ही कागदपत्र मागविली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू मुद्यांची माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना दिले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

कोणती माहिती मागविली होती१- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.२- शिवसेनेने विधानसभा सचिवालयात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.३- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.४ - भाजपने विधानसभा सचिवालयात शिवसेनेला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.

या सर्व प्रश्नांवर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही, असे उत्तर माहिती अधिकारांतर्गत दिले आहे.

दुसऱ्या एका अर्जाद्वारे संतोष जाधव यांनी राज्यपालांच्या कार्यालयाकडे २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षास राज्यपालांनी दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मागितली होती. मात्र, ही कागदपत्रे राज्यपालांकडेच असून सचिवालयाकडे अद्याप उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रम निकम यांनी दिले आहे.

राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या या माहितीनंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे सेना, भाजप आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण