शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बांधकामांवरील स्थगिती उठविली! ठाणे-पुण्यातील बांधकामे; अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती, हायकोर्टाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:26 IST

महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती.

मुंबई : महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. बुधवारी ही स्थगिती हटवत दोन्ही पालिकांना या परिसरातील नव्या बांधकामांना सीसी (कमेन्समेंट सर्टिफिकीट) व ओसी (आॅक्युपेशन सर्टिफिकीट) देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. मात्र, भविष्यात अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती देण्याचा इशाराही दिला.उन्हाळ्यात ठाण्याच्या घोडबंदर आणि पुण्याच्या बालेवाडी व बाणेर परिसरातील इमारतीतील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात आल्याने संबंधित पालिकांविरुद्ध दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. रहिवाशांना पुरेसे पाणी न देता उपलब्ध पाण्यापैकी बरेचसे पाणी नवीन बांधकामांकरिता वळते केले जात असल्याचा आरोप दोन्ही याचिकांमध्ये आहे.नागरिकांची ‘तहान’ न भागवणा-या दोन्ही पालिकांना फैलावर घेत एप्रिल २०१७ मध्ये याठिकाणी नवी बांधकामे उभारण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली होती. ‘येथील सोसायट्यांना पाणी पुरवठा संबंधी तक्रारी असतील तर याचिका दाखल करण्याचे जाहीर आवाहन आम्ही केले होते. मात्र कोणतीही सोसायटी उच्च न्यायालयात आली नाही. म्हणजे याचिकाकर्त्यांनी जेवढी पाण्याची कमतरता असल्याचे चित्र रंगवले तेवढी गंभीर समस्या नसावी. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांत पाण्याची समस्या नाही, असे मत आम्ही व्यक्त करू शकत नाही. मात्र ही स्थगिती कायम ठेवली, तर ज्यांनी येथे फ्लॅट घेतले आहेत, त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जर नवी बांधकामे बांधली आहेत त्यांना ओसी द्या व नवी बांधकामांसाठी सीसी द्या,’ असे न्यायालयाने सांगितले.समिती स्थापन करण्याचे निर्देशपाणी समस्या दूर करण्यासाठी दोन्ही पालिकांना महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, संबंधित पालिकांचे आयुक्त, मुख्य अभियंते (पाणीपुरवठा विभाग) आणि त्या जिल्'ातील विधि सेवा विभागाचे सचिव यांची एक समिती स्थापण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा संबंधित तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले. तसेच समितीला दोन महिन्यांनी अहवालही सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणेPuneपुणे