शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

नवा आरंभ : व्यवहार पूर्वपदावर; झोन हटविले, दिल्या सवलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:30 IST

राज्य सरकारचा निर्णय : तीन टप्प्यांत निर्बंध होणार शिथिल. शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम राहणार

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरिओम’ (‘मिशन बिगीन अगेन’) करत रविवारी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवत असतानाच प्रतिबंधित क्षेत्र वगळून हळूहळू तीन टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तसेच यापुढे राज्यात रेड, आॅरेंज, ग्रीन झोन असणार नाही.

रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असेल, मात्र त्यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. ६५ वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि १० वर्षांखालील मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून केवळ वैद्यकीय अथवा अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडता येईल.८ जून पासून सर्व खाजगी आस्थापना १० टक्के उपस्थितीमध्ये सुरु करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तर ५ जूनपासून सर्व मार्केट, दुकाने सुरु करता येणार आहेत. केंद्र सरकारने जरी मॉल्स आणि धार्मिक स्थळांना सुरु करण्यास परवानगी दिलेली असली तरी राज्याने मात्र त्यास मान्यता दिलेली नाही.निर्बंधातून सूट; टप्प्याटप्प्याने मोकळीकमुंबई महापालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मीरा भार्इंदर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांच्या हद्दीत काही सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलती कन्टेनमेंट झोनसाठी नसतील.प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स)महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तर संबंधित जिल्'ात जिल्हाधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक असेल. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवासी संकुल आणि वस्ती, झोपडी, इमारत, रस्ता, वॉर्ड, पोलीस ठाणे परिसर, छोटे गाव असू शकतील. पूर्ण तालुका, पूर्ण पालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक राहील. प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या ये-जा करण्यावर कडक निर्बंध आहे.खालील प्रमाणे प्रवास करण्यास मुभा आहे.- टॅक्सी, कॅब किंवा अ‍ॅपद्वारे बोलावलेल्या वाहनात चालक आणि २ प्रवासी बसू शकतील.- रिक्षामध्येही चालक आणि दोनच प्रवासी बसू शकतील.- चार चाकी वाहनात चालक आणि दोन प्रवाशांना परवानगी.- दुचाकीवर केवळ ती चालवणाऱ्या व्यक्तीलाच परवानगी.सवलतींचा दुसरा टप्पा ८ जूनपासून- सर्व खाजगी कार्यालयामध्ये १० टक्केपर्यंत कर्मचारी वर्ग उपस्थित राहू शकतो. मात्र घरातूनच काम करण्यावर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक.- स्टेडियम अथवा खुल्या आकाशाखाली असलेल्या बंदीस्त क्रीडा संकुलातील स्पर्धांना परवानगी. मात्र यासाठी प्रेक्षकांना प्रवेश नाही.- केवळ ५० टक्के आसने भरतील अशा पध्दतीने आंतर जिल्हा प्रवासासाठी बसेसना परवानगी.या बाबींना राज्यभर प्रतिबंध१) शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, विविध क्लासेस२) आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास३) मेट्रो रेल्वे सेवा४) स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.५) सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.६) सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी.७) सार्वजनिक धार्मिक स्थाने / पूजास्थळे बंद.८) केश कर्तनालये,, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.९) शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद.निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया तसेच यातील काही गोष्टींना सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाईल.३ जूनपासून खालील सवलती उपलब्ध1. घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी. समुद्र किनारे, खाजगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/धावणे/ जॉगिंगला काही अटींवर परवानगी. मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट. सामूहिक हालचालींना परवानगी नाही. मात्र मोकळ्या मैदानात गर्दी करता येणार नाही.2. प्लंबर, ईलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना कामे करता येतील. त्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे बंधनकारक.3. गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये ग्राहकाच्या पूर्व सूचनेनुसार वाहनांची दुरूस्ती4. सर्व शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचारी अथवा १५ कर्मचारी (जी संख्या जास्त असेल त्यानुसार) काम करतील.5. मॉल आणि शॉपिंग काँम्पलेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकाने सकाळी ९ ते ५ वेळेत सम-विषम नुसार उघडी राहतील.6. कपड्याच्या दुकांनामधील ट्रायल रूम बंद. तसेच एक्सचेंज आणि माल परत करण्याचे धोरण अथवा सुविधा बंद7. केवळ खरेदीसाठी चारचाकी वाहने घराबाहेर काढण्याला बंदी.8. विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यावर बंदी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस