फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितली नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:31 AM2021-10-22T08:31:22+5:302021-10-22T08:34:01+5:30

खाेडसाळ राजकारण करू नये

Never said anything secretly about devendra Fadnavis says Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितली नाही- नितीन गडकरी

फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितली नाही- नितीन गडकरी

Next

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितलेली नाही. विजय वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करून खोडसाळ राजकारण करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.

गडकरी यांनी फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची बाब गुपचूपपणे सांगितली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. यावर गडकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णत: निराधार व तथ्यहीन आहे. फडणवीस हे भाजपातील महत्त्वाचे नेते आहेत व माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. एकमेकांविरोधात कारस्थान करणे व एकमेकांची जिरविणे, ही काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेसचे मंत्री भाजपमध्येदेखील असा प्रकार करू पाहात आहेत, असा आरोप गडकरी यांनी केला. 

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती झाली. विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील चांगले कार्य करत असून, महाविकास आघाडी सरकारच्या चुकांवर नेमके बोट ठेवत आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी काँग्रेसला कुणीच भाव देत नाही व त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये नैराश्य आहे. चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसचे नेते बेजबाबदार वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावादेखील गडकरी यांनी केला.

Web Title: Never said anything secretly about devendra Fadnavis says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.