फेसबुक व्हायरसमुळे नेटीझन्स हैराण
By Admin | Updated: April 21, 2016 15:18 IST2016-04-21T14:14:24+5:302016-04-21T15:18:15+5:30
व्हायरसमुळे आपल्या अकाऊंटवर अश्लिल फोटो आणि व्हिडिओ शेअर होत असल्याची तक्रार फेसबुक युझर्स करत आहेत

फेसबुक व्हायरसमुळे नेटीझन्स हैराण
>शिवराज यादव -
मुंबई, दि. २१ - फेसबुकवर गेले काही दिवस अकाऊंट हॅक झाल्याचे मेसेज फिरत आहेत. या व्हायरसमुळे नेटीझन्स हैराण झाले आहेत. या व्हायरसमुळे आपल्या अकाऊंटवर अश्लिल फोटो आणि व्हिडिओ शेअर होत असल्याची तक्रार फेसबुक युझर्स करत आहेत. या व्हिडिओ किंवा फोटोमध्ये मित्रदेखील आपोआप टॅग होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या फेसबुक वॉलवर अकाऊंट हॅक झाल्याचे मेसेज टाकावे लागत आहेत. या व्हायरसमुळे ही लिंक मित्रांसोबतही शेअर होत आहे. त्यामुळे अशी कोणती लिंक आली असेल तर ओपन करु नका असं आवाहन अकाऊंट झालेले युजर्स करताना दिसत आहेत.
तुम्हाला एखादी अशी लिंक आली असेल आणि जर तुम्ही ती ओपन केलीत तर तुमच अकाऊंट लगेच हॅक होईल. सोबतच तुमच्या अकाऊंटवर अश्लिल फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला जाईल. तुमच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटोत तुमचे मित्रही टॅग झालेले असतील. सोबतच मेसेजची लिंक तुमच्या मित्रांना पाठवण्यात येईल. त्यामुळे तुमच्या मित्रांकडून जरी एखादा मेसेज आला असेल ज्यामध्ये लिंक पाठवण्यात आली असेल. तर तुमच्या मित्रानेच ती पाठवली आहे का ? याची प्रथम खात्री करा. खात्री केल्याशिवाय लिंक ओपन करु नका अथवा हा तुमचं अकाऊंटदेखील हॅक होण्याची शक्यता आहे. जर तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं असेल तर युझरनेम, पासवर्ड बदलणं योग्य ठरेल. फेसबुकने याप्रकरणी अजूनपर्यंत काही सूचना किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही.