नेस वाडियाने पेटत्या सिगारेट चेह:यावर फेकल्या

By Admin | Updated: July 23, 2014 04:07 IST2014-07-23T04:07:08+5:302014-07-23T04:07:08+5:30

उद्योगपती नेस वाडिया पेटती सिगारेट अंगावर फेके, खोलीत कोंडून ठेवत असे. दिवसेंदिवस त्याची क्रूरता वाढू लागली. कधी रागाच्या भरात तो माझी हत्या करेल,

Ness Wadia sticks cigarette face: thrown on | नेस वाडियाने पेटत्या सिगारेट चेह:यावर फेकल्या

नेस वाडियाने पेटत्या सिगारेट चेह:यावर फेकल्या

मुंबई : उद्योगपती नेस वाडिया पेटती सिगारेट अंगावर फेके, खोलीत कोंडून ठेवत असे. दिवसेंदिवस त्याची क्रूरता वाढू लागली. कधी रागाच्या भरात तो माझी हत्या करेल, अशी भीती मला होती, असा सनसनाटी आरोप अभिनेत्री प्रीती ङिांटाने केला आहे. 
प्रीतीने केलेल्या तक्रारीनुसार, मरीनड्राईव्ह पोलिसांनी नेस यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला 
आहे. प्रीतीच्या या तक्रारीची पोलीस नेसकडे चौकशी करू शकतील. गुन्हा दाखल झाल्यानंतर 3क् जून रोजी प्रीतीने 
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती. तेव्हा प्रीतीने चार पानी पत्र मारिया यांना दिले. या पत्रत 3क् मे रोजी 
वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेचे तपशील होतेच. मात्र त्याआधी नेस 
याने केलेल्या शारीरिक अत्याचारांचाही तपशील होता. 
 
दुसरा पर्याय नव्हता..
च्प्रीतीने पत्रत नमूद केले आहे की, नेसने अनेकदा पेटत्या सिगारेट चेह:यावर भिरकावल्या. अनेकदा खोलीत कोंडून ठेवले. मारहाणीचा प्रय} केला होता. 
च्पोलीस तक्रार करून नेसचे मन मला दुखवायचे नव्हते. पण त्याच्यासोबत राहताना मला जीवाची भीती वाटू लागली होती. रागाच्या भरात तो माझी हत्या करेल, असे मला वाटत होते. 
च्त्यामुळे माङयाकडे दुसरा पर्याय नव्हता, असे प्रीतीने या पत्रत नमूद केल्याचे तपासाशी संबंधित पोलीस अधिका:याने सांगितले.

 

Web Title: Ness Wadia sticks cigarette face: thrown on