नेपाळी तरुणाची बदलापूरमध्ये हत्या

By Admin | Updated: March 16, 2017 03:55 IST2017-03-16T03:55:19+5:302017-03-16T03:55:19+5:30

कात्रप परिसरात एका चायनीज फूडच्या दुकानात नेपाळी तरुणाची हत्या करण्यात आली. दुकानात कूक म्हणून काम करणाऱ्या आरोपी

Nepali youth killed in Badlapur | नेपाळी तरुणाची बदलापूरमध्ये हत्या

नेपाळी तरुणाची बदलापूरमध्ये हत्या

बदलापूर : कात्रप परिसरात एका चायनीज फूडच्या दुकानात नेपाळी तरुणाची हत्या करण्यात आली. दुकानात कूक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने आपल्याच मित्राची हत्या केली. हत्येनंतर धड दुकानात लपवले आणि त्याचे मुंडके कात्रप परिसरातील एका दुकानाबाहेर फेकले. सकाळी दुकान उघडल्यावर दुकानदारांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, आरोपी पळतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाले. दरम्यान, भुसावळ स्थानकात आरोपी राजेश नेपाळीला पुष्पक एक्स्प्रेसमधून रेल्वे पोलिसांनी अटक केली.
हत्या झालेला तरुण याच भागात असलेल्या जय मल्हार खाणावळीत कूकचे काम करणाऱ्या राजेश नेपाळी याच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. पाहुणा म्हणून आल्याने त्याची ओळख कुणालाच पटली नाही. मात्र, राजेश आणि त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यामध्ये वादावादी झाल्याने त्याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री १२च्या सुमारास हत्या केल्यावर राजेश याने त्या तरुणाचे मुंडके धडापासून वेगळे केले. मुंडके पिशवीत भरले. त्यानंतर, त्याने हा मृतदेह दुकानातच लपवून आपली बॅग घेऊन बाहेर पडला. सोबत, मृतदेहाचे मुंडके भरलेली पिशवी हातात होती. रात्री ३च्या सुमारास राजेशने ही पिशवी कात्रप परिसरातील निर्मल रेसिडेन्सी या इमारतीखाली असलेल्या दुकानाबाहेर ठेवली. त्यानंतर, तो तेथून पळून गेला. मात्र, पिशवी ठेवल्यानंतर पळतानाचे चित्रीकरण दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. पोलिसांनी लागलीच या सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. पण राजेशकडे पाहुणा म्हणून आलेला हा तरु ण कोण होता व त्याची हत्या कोणी, कशासाठी केली, हे गुलदस्त्यात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nepali youth killed in Badlapur