शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ प्लेन क्रॅशची इमोशनल स्टोरी! कोर्टाचा तो निर्णय; महाराष्ट्रातील ते चौघे एकत्र आलेले, शेवटचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:47 IST

4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमान नेपाळमध्ये कोसळल्याची घटना काल घडली. या अपघात ज्या 4 भारतीयांचा मृत्यू झाला, ते ठाण्याचे रहिवासी होते.

Nepal Plane Crash: 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना काल घडली. या अपघात ज्या 4 भारतीयांचा मृत्यू झाला, ते ठाण्याचे रहिवासी होते. आई-वडील आणि दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या कुटुंबाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत दाम्पत्य घटस्फोटीत होतं आणि कोर्टाच्या आदेशानुसार एकत्र आलं होतं.

वर्षातून एकदा एकत्र यायचेविमानअपघातात मृत्यू झालेल्या अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी यांचा घटस्फोट झाला होता. पण, न्यायालयाच्या आदेशानुसार, दोघांना वर्षातून एकदा एकत्र येण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार अशोक 10 दिवस मुलांसह कुटुंबाला भेट देऊ शकत होता. कुटुंबात पती-पत्नीशिवाय 22 वर्षांचा मुलगा धनुष आणि 15 वर्षांची मुलगी रितिका होती. न्यायालयाचा आदेशानुसार, कुटुंब एकत्र यायचे, तोच त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. 

तीन दिवसांपूर्वी नेपाळला पोहोचले न्यायालयाच्या आदेशानंतर 54 वर्षीय अशोक कुमार त्रिपाठी यांनी पत्नी वैभवी (51 वर्षे) आणि मुलगा आणि मुलगी यांच्यासह नेपाळला जाण्याचा विचार केला होता. यासाठी हे लोक तीन दिवसांपूर्वी नेपाळला पोहोचले होते. येथे पोहोचल्यानंतर यांनी मध्य नेपाळमधील जोमसोम या प्रसिद्ध पर्यटन शहराला भेट देण्याचे ठरवले. यासाठी तारा एअरलाइनमध्ये तिकीट काढले होते. मात्र, याच विमान अपघातात कुटुंबाचा अंत झाला. 

वैभवी आजारी आईसोबत राहायचीघटस्फोटानंतर वैभवी बांदेकर त्रिपाठी आपल्या दोन मुलांसह ठाणे-नाशिक महामार्गावरील रुस्तम जी अथेना येथे राहत होती. मुलगा धनुष कॉलेजमध्ये शिकत होता तर मुलगी शाळेत शिकत होती. वैभवीची आई आजारी असते, त्यामुळे आईकडे राहून वैभवी तिची काळजी घेत होती. वैभवी नेपाळला गेल्यानंतर तिची मोठी बहीण संजीवनी तिच्या आईची काळजी घेण्यासाठी आली होती.

नेमकं काय झालं?तारा एअरच्या 'ट्विन ऑटर 9N-AET' विमानाने रविवारी सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर 15 मिनिटांनी त्याचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यात, चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :NepalनेपाळthaneठाणेairplaneविमानAccidentअपघात