शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:00 IST

जॉर्ज फर्नांडीस यांचे चरित्र पत्रकार निळू दामले लिहित असून राजहंस प्रकाशनातर्फे ते लवकरच प्रकाशित होत आहे.दामले यांना जाणवलेले जॉर्ज...

-राजू इनामदार-

पुणे : जॉर्ज फर्नांडींस यांचा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सहभाग सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थक असलेल्या जॉर्ज यांचे उजव्या विचारसरणीचे तसेच समर्थक असलेल्या वाजपेयी यांच्याबरोबर सख्य जमले तरी कसे? ---अनेकांसाठी जॉर्ज यांचा वाजपेयी सरकारमधील सहभाग भूवया उंचावणारा होता. पुस्तक लिहिताना यावर काही जाणवले का? निळू दामले-- जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सहभाग होता. त्याचवेळी वाजपेयी व जॉर्ज यांची ओळख झाली. नंतर जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा त्यांच्या सर्वच संघटना या नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाल्या. जॉर्ज त्या आंदोलनात सुरूवातीपासून होताच. तेव्हापासून जॉर्ज व वाजपेयी परस्परांशी परिचित होते. दोघांच्याही व्यक्तीमत्वात एक साम्य आहे  व ते म्हणजे त्यांच्यातील उमदेपणा. दोघेही स्वभावाने एकदम दिलदार होते. अडचणीत आलेल्या कोणालाही त्वरीत मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. कोणी काही केले तर त्याचे कौतूक केल्याशिवाय दोघांनाही रहावत नव्हते. त्यांच्या स्वभावातील या साम्यानेच त्यांना एकत्र आणले असे मला वाटते. -- दोघांच्याही विचारधारा भिन्न असतानाही जमले कसे? दामले-- मला वाटते हा डावा, तो उजवा असा विचार आपण करतो. तसे दिसतही असते. पण मोठा विचार करणारी माणसे अशी विचारधारा कायम ठेवूनही विरोधी विचारधारा असणाºयांबरोबर राहू शकतात. जॉर्ज यांच्यावर त्यावेळी भरपूर टीका झाली, मात्र सत्तेसाठी, स्वाथार्साठी त्यांनी हे धोरण स्विकारले असे ना जॉर्ज यांनी कोणी म्हणाले, ना वाजपेयी यांना! त्यांच्यासाठी ते एकत्र येणे फक्त सत्तेसाठी नव्हते, तर त्यांना नको असलेली विचारधारा सत्तेबाहेर ठेवण्यासाठीचे एकत्र येणे होते. त्यात कोणाचाही फायदा नव्हता किंवा तोटाही नव्हता.--दोघांमध्ये आणखी काय साम्य होते?दामले--जॉर्ज म्हणजे प्रचंड सकारात्मक होते. अगदी तसेच वाजपेयीसुद्धा होते. दोघांच्याही विचारात औषधालाही नकारात्मकता नव्हती. त्यामुळेही त्यांचे सख्य जुळले असावे.विरोधा झाला तरी तो समजून घेऊन काम पुढे नेण्याची त्यांची भूमिका असायची. सरकार तयार करताना जॉर्ज यांना वाजपेयी यांनी बोलावले ते या सकारात्मकतेतून व जॉर्जही आले ते त्याच भूमिकेतून. ---पुर्ण काळ ते सरकारमध्ये बरोबरच होते?दामले---फक्त बरोबर नव्हते तर त्याकाळात जॉर्ज यांनी अनेकदा वाजपेयी यांच्या सांगण्यावरून सरकार वाचवण्याची जबाबदारीही पार पाडली. वाजपेयीच त्यांच्यावर ही विश्वासाने ही जबाबदारी सोपवत. त्याचा जॉर्ज यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही.---जॉर्ज यांनी आपल्या तत्वांना मुरड घातली असेही बोलले जात होते.दामले--मला तरी तसे वाटत नाही. त्या सरकारला पाठिंबा देण्याचे स्वत: जॉर्ज यांनीच चांगले समर्थन केले आहे. कितीतरी वेळा अनेक योजनांना जॉर्ज यांनी विरोध केला आहे. अरूण शौरी एक विधेयक पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना जॉर्ज यांनी तीव्र विरोध केला. जॉर्ज यांचे अखेर ऐकावेच लागले. त्या सरकारच्या काळात अगदी शेवटपर्यत ना जॉर्ज हिदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी. पण तरीही दोघे एकत्रच होते. तेसुद्धा कसलेही वादविवाद न होता. याला कारण सुरूवातीला सांगितले तेच आहे, उमदेपणा! दोघांनाही आपापल्या मयार्दा माहिती होत्या व वैशिष्ट्येही. त्यामुळेच त्यांचे सख्य जुळुन आले असावे.  

टॅग्स :PuneपुणेGeorge Fernandesजॉर्ज फर्नांडिसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी