शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबतच्या पोलिसांच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:14 IST

वणी वेकोलि क्षेत्रातील खाणींमधून कोळशाची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असताना खाणींमध्ये रात्रपाळीत ठेवण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा पांगळी असते. यामागे वेकोलि प्रशासनाचा हेतू कोणता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वणी (यवतमाळ) - वणी वेकोलि क्षेत्रातील खाणींमधून कोळशाची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असताना खाणींमध्ये रात्रपाळीत ठेवण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा पांगळी असते. यामागे वेकोलि प्रशासनाचा हेतू कोणता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खाणीतील कोळशाची वा अन्य साहित्याची चोरी होऊ नये, याची खबरदारी वेकोलि प्रशासनानेच घेणे अपेक्षित असताना तशा कोणत्याही सशक्त उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. खाणीत होणाºया चोºया रोखण्यासाठी कडेकोट सुरक्षा यंत्रणा उभी करण्याबाबत पोलिसांनी वेकोलि प्रशासनाला अनेकदा पत्र लिहिले. मात्र, त्या पत्रांना वेकोलिने केराची टोपली दाखविल्याची चर्चा आहे. वेकोलिने तगडी सुरक्षा यंत्रणा उभारल्यास कोळसा चोरीला चाप बसू शकतो. मात्र तसे करण्यात वेकोलिने कोणताही पुढाकार घेतला नाही. यामुळे वेकोलि प्रशासनाचेच कोळसा चोरीला पाठबळ तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.विशेष म्हणजे, खाणीतून मोठ्या प्रमाणावर कोळसा लंपास केला जात असताना वेकोलिने पोलिसांकडे तक्रार करणे अभिप्रेत आहे. परंतु असे असतानाही अनेकदा पोलिसांकडे तक्रारच करण्यात येत नसल्याचेदिसून आले. (समाप्त)‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर तस्कर भूमिगत‘लोकमत’मध्ये गेल्या चार दिवसांपासून प्रकाशित हो या वृत्तमालिकेने धास्तावलेले कोळसा तस्कर भूमिगत झाले आहेत. खाणीतून होणारी कोळसा चोरी तूर्तास थांबली असून ज्या ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात होती, तेथेही शुकशुकाट आहे. या प्रकरणात आता वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भंगारावरही डल्लाखाणींमधून केवळ कोळसाच नाही, तर करोडो रुपयांचे भंगारही लंपास केले जात आहे. वणी वेकोलि क्षेत्रातील अनेक कोळसा खाणी बंद आहेत. या खाणींमध्ये करोडो रुपये किंमतीचे भंगार उघड्यावर पडून आहे. त्याचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.मागील आठवड्यात वणीतील कुंभारखणी खाणीतून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे भंगार लंपास करणाºया चौैघांना पोलिसांनी लाखोंच्या भंगारासह जेरबंद केले. कोळसा खाणींची सुरक्षा यंत्रणा भेदून खाणीत शिरण्याची हिम्मत या चोरट्यांमध्ये येते कुठून? त्यांना कुणाचे पाठबळ आहे? याची सखोल चौैकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र