सुरक्षेबाबतच्या पोलिसांच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:14 AM2018-03-10T04:14:07+5:302018-03-10T04:14:07+5:30
वणी वेकोलि क्षेत्रातील खाणींमधून कोळशाची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असताना खाणींमध्ये रात्रपाळीत ठेवण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा पांगळी असते. यामागे वेकोलि प्रशासनाचा हेतू कोणता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणी (यवतमाळ) - वणी वेकोलि क्षेत्रातील खाणींमधून कोळशाची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असताना खाणींमध्ये रात्रपाळीत ठेवण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा पांगळी असते. यामागे वेकोलि प्रशासनाचा हेतू कोणता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खाणीतील कोळशाची वा अन्य साहित्याची चोरी होऊ नये, याची खबरदारी वेकोलि प्रशासनानेच घेणे अपेक्षित असताना तशा कोणत्याही सशक्त उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. खाणीत होणाºया चोºया रोखण्यासाठी कडेकोट सुरक्षा यंत्रणा उभी करण्याबाबत पोलिसांनी वेकोलि प्रशासनाला अनेकदा पत्र लिहिले. मात्र, त्या पत्रांना वेकोलिने केराची टोपली दाखविल्याची चर्चा आहे. वेकोलिने तगडी सुरक्षा यंत्रणा उभारल्यास कोळसा चोरीला चाप बसू शकतो. मात्र तसे करण्यात वेकोलिने कोणताही पुढाकार घेतला नाही. यामुळे वेकोलि प्रशासनाचेच कोळसा चोरीला पाठबळ तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.
विशेष म्हणजे, खाणीतून मोठ्या प्रमाणावर कोळसा लंपास केला जात असताना वेकोलिने पोलिसांकडे तक्रार करणे अभिप्रेत आहे. परंतु असे असतानाही अनेकदा पोलिसांकडे तक्रारच करण्यात येत नसल्याचे
दिसून आले. (समाप्त)
‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर तस्कर भूमिगत
‘लोकमत’मध्ये गेल्या चार दिवसांपासून प्रकाशित हो या वृत्तमालिकेने धास्तावलेले कोळसा तस्कर भूमिगत झाले आहेत. खाणीतून होणारी कोळसा चोरी तूर्तास थांबली असून ज्या ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात होती, तेथेही शुकशुकाट आहे. या प्रकरणात आता वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंगारावरही डल्ला
खाणींमधून केवळ कोळसाच नाही, तर करोडो रुपयांचे भंगारही लंपास केले जात आहे. वणी वेकोलि क्षेत्रातील अनेक कोळसा खाणी बंद आहेत. या खाणींमध्ये करोडो रुपये किंमतीचे भंगार उघड्यावर पडून आहे. त्याचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.
मागील आठवड्यात वणीतील कुंभारखणी खाणीतून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे भंगार लंपास करणाºया चौैघांना पोलिसांनी लाखोंच्या भंगारासह जेरबंद केले. कोळसा खाणींची सुरक्षा यंत्रणा भेदून खाणीत शिरण्याची हिम्मत या चोरट्यांमध्ये येते कुठून? त्यांना कुणाचे पाठबळ आहे? याची सखोल चौैकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.