सनातन संस्थेची नाहक बदनामी - डॉ. चारुदत्त पिंगळे
By Admin | Updated: June 16, 2016 18:27 IST2016-06-16T18:27:22+5:302016-06-16T18:27:22+5:30
सनातन संस्थेच्या साधकांना गुन्हे प्रकरणांत अडकवून संस्थेची नाहक बदनामी चालविल्याचा आरोप संस्थेचे अखिल भारतीय पातळीवरील नेते डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन संस्थेची नाहक बदनामी - डॉ. चारुदत्त पिंगळे
>पणजी : सनातन संस्थेच्या साधकांना गुन्हे प्रकरणांत अडकवून संस्थेची नाहक बदनामी चालविल्याचा आरोप संस्थेचे अखिल भारतीय पातळीवरील नेते डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. अजूनर्पयत एकाही साधकाविरुद्ध तपास यंत्रणा गुन्हा सिद्ध करू शकलेल्या नाहीत, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, सनातन संस्था ही हिंदू विचारसरणीला वाहून घेतलेली आध्यात्मिक प्रबोधनाची संस्था आहे. एखादा विचार पटला नसेल तर त्याविरुद्ध वैचारिक लढाई देण्यामध्ये संस्था विश्वास बाळगते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी संस्थेचे वैचारिक मतभेद होते व त्या विचारसरणीविरुद्ध संस्था अजून लढा देत आहे. असे असताना विनाकारण आमच्या साधकांना अटक करून संस्थेची बदनामी चालविली आहे. त्यांनी जर गुन्हा केला असे तपास यंत्रणांना वाटत असेल तर निश्चितपणो या प्रकरणात सखोल तपास करावा. जलद न्यायालयात या प्रकरणात खटले चालवावे आणि प्रकरणाचा छडा लावावा; परंतु कोणत्याही पुराव्याशिवाय सनातनच्या कार्यकत्र्याना छळू नये.
या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे, हिंदू महासभेचे शिवप्रसाद जोशी अणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव नागेश ताकभाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)