'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात झाला करमुक्त
By Admin | Updated: February 24, 2016 17:00 IST2016-02-24T17:00:49+5:302016-02-24T17:00:49+5:30
अभिनेत्री सोनम कपूरचा 'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात झाला करमुक्त
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेत्री सोनम कपूरचा 'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आज सोनम कपूर ने ट्विट करुन नीरजा चित्रपट तातडीने करमुक्त केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
नीरजा हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. स्वत:चा जीव गमावून तीनशेपेक्षा जास्त प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या धाडसी हवाईसुंदरी नीरजा भानोतच्या कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.
प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांतच त्याने २२ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. प्रसारमाध्यमांतूनही ‘नीरजा’चे कौतुक झाल्यामुळे पहिल्या दिवशी त्याची चार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली. ‘नीरजा’सोबत इतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले तरी ‘नीरजा’ला प्रेषकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. चित्रपट बघणाऱ्यांची प्रतिक्रिया त्याच्या यशात मोठी भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्रात निरजा चित्रपट करमूक्त झाल्यामुळे तो जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहचेल. निरजाच्या धाडसाचे कथानक लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी मांडले.
A big Thank You to the Government of Maharashtra for making #Neerja tax free with immediate effect. Humbled.
— Sonam Kapoor (@sonamakapoor) February 24, 2016