शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:48 IST

नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान अपमानजनक, बदनामीकारक आहेत. खळबळ उडवून देण्यासाठी अशी विधाने करणे दुर्दैवी आहे असंही नोटिशीत सांगितले आहे.

पुणे - उद्धव ठाकरे गटात २ मर्सिडीज दिल्यावर १ पद मिळते असं विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी केले. नीलम गोऱ्हे यांच्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आले. ठाकरे गटाने नीलम गोऱ्हेंवर पलटवार करत तुम्हाला आतापर्यंत ४ वेळा विधान परिषद दिली तेव्हा तुम्ही किती मर्सिडीज दिल्या असा सवाल विचारला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्याने नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून उद्धव ठाकरेंचं प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे.

रविवारी दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी गोऱ्हे यांनी नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिले आहे.

या नोटीशीत काय म्हटलंय?

असीम सरोदे यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलंय की, ज्याअर्थी नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मानहानीकारक विधान केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचा अपमान करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे त्यांना मर्सिडीज गिफ्ट देतात त्यांनाच महत्त्वाची पदे मिळतात असा आरोप केला. यातून पक्षातील नियुक्त्या केवळ आर्थिक बळ दाखवल्यावरच मिळतात असं चित्र उभं करण्यात आले. हे सर्व चुकीचं आणि बिनबुडाचे विधान आहे. त्यातून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असं सांगितले आहे.

नीलम गोऱ्हे यांचं हे विधान माध्यमांमध्ये दाखवण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का लागला. या संमेलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचेही भाषण झाले परंतु त्यात कुठलेही वादग्रस्त विधाने नाहीत. नीलम गोऱ्हे यांनी विनाकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बदनाम करण्यासाठी साहित्य संमेलनासारखं व्यासपीठ निवडलं. या संमेलनाच्या आयोजकांनीही नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना किती मर्सिडीज कार भेट दिली, जर तुम्ही केलेल्या आरोपात तथ्य असेल तर त्या सर्व कारचे नोंदणी क्रमांक द्यावेत. उद्धव ठाकरे यांना भेट देणाऱ्या पक्षातील सदस्यांची नावे सांगावी, त्यांना कुठले पद मिळाले हे सांगावे असं कायदेशीर नोटिशीत म्हटलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान अपमानजनक, बदनामीकारक आहेत. खळबळ उडवून देण्यासाठी अशी विधाने करणे दुर्दैवी आहे असंही नोटिशीत सांगितले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेSushma Andhareसुषमा अंधारेAsim Sarodeअसिम सराेदे