शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: धर्मांध लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज; अमोल मिटकरींनी लावला ‘तो’ व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:09 IST

महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले.

मुंबंई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. पवारांना हिंदू शब्दाची एलर्जी असल्याचा आरोप राज यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीवाद फोफाळला. जातीद्वेष शरद पवारांनी पसरवला असा आरोप करत औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले.

राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी(NCP Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अमोल मिटकरींनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर सिनेमातील एक किस्सा शेअर करत म्हटलंय की, महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे.

ठाण्याच्या उत्तर सभेनंतर औरंगाबाद येथे होणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच्या राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सभा १९८८ साली  या मैदानावर झाल्या होत्या. तीच किंबहुना त्यापेक्षा जास्त  गर्दी, तसाच जोष, जल्लोष यावेळी दिसला. शिवसेनेसाठी ही खरी डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात.

राज ठाकरेंनी केले शरद पवारांना टार्गेट

प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना नेहमीच टार्गेट केले. मात्र औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी त्याचाच आधार घेत म्हटलं की, मी शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र, पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज म्हणाले. माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmol Mitkariअमोल मिटकरीSharad Pawarशरद पवार