शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

By admin | Published: February 04, 2017 12:02 AM

प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कोल्हापूर : ‘शहराची जीवनदायिनी’ असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष धोरण ठरवून कडक कायदा करायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील काटेकोरपणे व्हायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूर हा देशातील सर्वाधिक नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नता असलेला जिल्हा आहे. येथील संपन्नतेबरोबरच काही चुकीच्या गोष्टी ही येथे आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या जलस्रोतांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण प्रकल्पासारखी तात्पुरती उपाययोजना कामाची नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करायला हवा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.कोल्हापूरचे मानवी व नैसर्गिक आरोग्य यांची सांगड घालीत विकासाचे नियोजन केल्यास पंचगंगेसारखी नदी प्रदूषणमुक्त करता येईलच; त्यासह मानवी आरोग्याचा दर्जाही वाढविता येईल. यासाठी जनजागृतीबरोबरच शासकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला डॉ. एम. एम. अली, डॉ. ए. आर. कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदी उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा.नदीला आपण माता म्हणतो, मग तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारीराज्यात सर्वाधिक धरणे असूनही जलनियोजनाकडे दुर्लक्ष झालेअर्थसंकल्पात कृषिक्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला हवेलोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वी; परंतु ठेकेदारांमुळे योजनेवर प्रश्नचिन्हमानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर व अधिक गुंतागुंतीचा,भयानक बनत चालला आहे.नदीजोड प्रकल्प देशासाठी अहिताचाकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.