फूड सेफ्टीसाठी सुधारित नियमावलीची आवश्यकता

By Admin | Updated: June 8, 2015 02:21 IST2015-06-08T02:21:01+5:302015-06-08T02:21:01+5:30

शीतपेयांमध्ये झालेली भेसळ, कॅडबरीमध्ये आढळलेल्या अळ्या आणि आता मॅगीत आढळलेले शिसाचे जास्त प्रमाण, यामुळे पॅकबंद अन्नपदार्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

The need for revised rules for food safety | फूड सेफ्टीसाठी सुधारित नियमावलीची आवश्यकता

फूड सेफ्टीसाठी सुधारित नियमावलीची आवश्यकता

मुंबई : शीतपेयांमध्ये झालेली भेसळ, कॅडबरीमध्ये आढळलेल्या अळ्या आणि आता मॅगीत आढळलेले शिसाचे जास्त प्रमाण, यामुळे पॅकबंद अन्नपदार्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याला आळा घालण्यासाठी फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अथोरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय) येथे फूड स्फेटीसाठी सुधारित नियमावली आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या(एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
खाद्यपदार्थाचे कोणतेही उत्पादन बाजारपेठेत येण्यापूर्वी एफएसएसएआयच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्या उत्पादनात असलेल्या घटकांची तपासणी केली जाते, यानंतरच ते उत्पादन बाजारात आणण्यासाठी परवानगी दिली जाते. पण, त्यानंतर उत्पादित होणाऱ्या प्रत्येक बॅचला परवानगी घेण्याची आवश्यकता नसते, असे एका एफडीए अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रातून सुधारित नियमावली लवकरात लवकर आल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

> शिसाचे प्रमाण वाढल्यास
मेंदूचे विकार होण्याचा धोका
मज्जासंस्थेवर परिणाम होतो
डोकेदुखी वाढते
ताण वाढतो
स्मरणशक्ती कमी होणे

> एमएसजी वाढल्यास
मज्जासंस्थेवर परिणाम होतो
रक्तदाब वाढतो
शरीरातील काही अवयवांमध्ये जळजळ होते

Web Title: The need for revised rules for food safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.