‘पार्किंग समस्या सोडवण्यासाठी धोरण आवश्यक’
By Admin | Updated: January 7, 2017 06:15 IST2017-01-07T06:15:26+5:302017-01-07T06:15:26+5:30
शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे

‘पार्किंग समस्या सोडवण्यासाठी धोरण आवश्यक’
मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. वेळीच पार्किंगची समस्या न सोडवल्यास आगामी पाच वर्षात ही स्थिती अत्यंत भयंकर होईल. पदपथवरुन चालण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले.
‘मोकळया जागेचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत आहे. कोणत्या रस्त्यावर पार्किंग करायचे किंवा कोणत्या रस्त्यावर करायचे नाही, अशी काही वर्गवारी करण्यात आली आहे का? महापालिकेचे पार्किंगसंदर्भात सर्वसमावेश धोरण अस्तित्वात आहे का?’ असे प्रश्न मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या.गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला केले.
‘यासंदर्भात महापालिकेकडे कोणतेही धोरण नाही. ही समस्या हाताळणाऱ्या कोणत्याही प्रशासनांचा एकमेकांशी ताळमेळ नाही,’ असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या सोडवण्यासाठी जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. (प्रतिनिधी)