जैन तत्त्वज्ञानाची गरज
By Admin | Updated: February 4, 2015 02:07 IST2015-02-04T02:07:51+5:302015-02-04T02:07:51+5:30
१००८ भगवान बाहुबलींनी अहिंसा, सत्य, त्याग व तपश्चर्येचा संदेश जगातील प्राणिमात्रांना दिला होता. याच उपदेशांची आज जगाला आत्यंतिक गरज आहे.

जैन तत्त्वज्ञानाची गरज
बाहुबली (जि़ कोल्हापूर) : १००८ भगवान बाहुबलींनी अहिंसा, सत्य, त्याग व तपश्चर्येचा संदेश जगातील प्राणिमात्रांना दिला होता. याच उपदेशांची आज जगाला आत्यंतिक गरज आहे. देशाच्या विकासासाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी जैन तत्त्वज्ञानाची गरज भासत आहे.
या तत्त्वज्ञानाची बिजे बाहुबली आश्रम आणि विद्यापीठात रुजवली जात आहेत, ही कौतुकास्पद
बाब आहे. हा महामस्तकाभिषेक सोहळा म्हणजे अहिंसा व विश्वशांतीचा संदेश देणारा महामहोत्सव आहे, अशी उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काढले.
कोल्हापूर जिल्ह्णातील हातकंणगले तालुक्यातील बाहुबली येथे १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, सदाभाऊ खोत यांच्यासह समंतभद्र मंचावर
१०८ वर्धमान सागरजी महाराज,
त्यांचा संपूर्ण संघ, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, आर्यिका ज्ञानमती माताजी संघ व लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, बाहुबली संस्थेने संस्कारक्षम पिढी निर्माण केली आहे. १९३४ पासून या संस्थेने ज्ञानदानाचे काम अव्याहतपणे केले आहे.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारामुळेच संपूर्ण महामस्तकाभिषेकातील अन्नदानाचा खर्च माजी विद्यार्थी करीत आहेत, ही बाब स्फुरणीय आहे.
या भागातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी बाहुबली तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती दिली. क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने बाहुबली व परिसरातील पाणीपुरवठा योजना, गुरुकुल वसतिगृहाची अद्ययावत इमारत, गुरुकुलातील मुलांसाठी भोजनगृह व परिसराला अहिंसाक्षेत्र घोषीत करावे आदी मागण्या त्यांनी केल्या.
खासदार शेट्टी म्हणाले, बाहुबलीच्या विकासासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्र्यांनी द्यावा. देशभरातून लाखो भाविक इथे येतात. त्यामुळे या क्षेत्रास आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली. वीर सेवा दलाचेही त्यांनी कौतुक केले.
उपस्थितांची
मने जिंकली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात दिगंबर मुनी व त्यागींना उद्देशून ‘नमोस्तू’ व श्रावक-श्राविकांना उद्देशून ‘जय जिनेंद्र’ म्हणून केली, तर भाषणाचा शेवट पुन्हा ‘जय जिनेंद्र’ म्हणून केला आणि उपस्थितांची मने जिंकली.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा
च्बाहुबली परिसरातील गावांना आवश्यक पाणीपुरवठा योजना, वसतिगृह, गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह, बहुउद्देशीय सभागृह आदी मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही
च्शिवाजी विद्यापीठामधील महावीर अध्यासन केंद्रासाठी निधीची त्वरित पूर्तता करणार
च् बाहुबली परिसराला अहिंसा क्षेत्र घोषित करण्याबाबत आदेश काढणार