गतीरोधकाची तलासरी उधवा मार्गावर गरज
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
तलासरी उधवा राज्यमार्ग सध्या अत्यंत धोकादायक झाला असून अवजड वाहने तसेच दुचाकी चारचाकी वाहनाच्या भन्नाट वेगाने लोकांना चालणे अवघड झाले आहे

गतीरोधकाची तलासरी उधवा मार्गावर गरज
तलासरी : तलासरी उधवा राज्यमार्ग सध्या अत्यंत धोकादायक झाला असून अवजड वाहने तसेच दुचाकी चारचाकी वाहनाच्या भन्नाट वेगाने लोकांना चालणे अवघड झाले आहे
या मार्गावर गतिरोधकाची गरज असून तशी मागणी जनतेने केली आहे चार चाकी व दुचाकी वाहनाच्या वेगावर पोलिसांचा लगाम नसल्याने जनतेला मात्र जीव मुठीत धरून रास्ता ओलांडावा लागतो तलासरीत दुचाकी वर दोघे जण हे तर किरकोळ पण तिघे चौघे बसवून भन्नाट वेगात गाडी पळविणे मोटार सायकलचे सायलन्सर काढून कर्णकर्कश आवाजाने गाडी पळविणे हि तर फॅशन झाली आहे.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे मोटरसायकलच्या भन्नाट वेगाने तलासरी भागात अनेकांचे अपघात होऊन त्यात बळींहि पडले आहेत भन्नाट वेग नियम बाह्य मोटार सायकल चालविन्याऱ्यांवर
पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास राजकारण्यांचा दबाव येत असल्याने पोलिसही हतबल मोटरसायकल जोरात पळवू नका वाहने चालविण्याचा परवाना काढा अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देऊ नका असे पोलिसतर्फे नागरिकांच्या सभेत वारंवार सांगण्यात येते परंतु पालथ्या घड्यावर पाणी. (वार्ताहर)