तगड्या उमेदवारांसाठी रस्सीखेच अपक्ष व विद्यमान नगरसेवकांसाठी गळ
By Admin | Updated: January 30, 2017 21:29 IST2017-01-30T21:29:19+5:302017-01-30T21:29:46+5:30
युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना

तगड्या उमेदवारांसाठी रस्सीखेच अपक्ष व विद्यमान नगरसेवकांसाठी गळ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा असे सर्व मोठे राजकीय पक्ष स्वबळावरच मैदानात उतरणार आहेत. मात्र गेली २५ वर्षे युतीच्या बळावर निवडून येणाऱ्या शिवसेना-भाजपाची आता गोची झाली आहे. त्यामुळे अडचणीच्या अशा प्रभागांमध्ये विजयाच्या खात्रीसाठी तेथील विद्यमान नगरसेवकाला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी अपक्ष मात्र तगड्या उमेदवारांना गळ टाकला जात आहे.
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 12 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसताना केवळ प्रभागातील जनसंपर्काच्या जोरवार या उमेदवारांनी बाजी मारली होती. या अपक्षांच्या पाठिंब्यावरच शिवसेना-भाजपा युतीने सत्तेसाठी ११४ चा मॅजिक आकडा गाठला होता. ७५ नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेला या अपक्षांची महापौर निवडणुकीत लाभदायक ठरली. यामुळेच मित्रपक्ष भाजपाची खेळी सुरु असताना शिवसेनेचे पारडे जड राहिले.
उभय पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने खात्रीच्या जागा सोडल्यास अन्य प्रभागांचा अंदाज दोन्ही पक्षांना नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेवेळी असे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक हात मजबूत करतील. म्हणून आतापासून दोन्ही पक्षातून अपक्ष व खात्रीच्या उमेदवारांसाठी गळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. विजयाची खात्री असलेले प्रभाग सोडल्यास अडचणीच्या प्रभागांमध्ये कोणाचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी पक्षच मजबूत असल्यास त्यांच्यापुढे कोण तगडे आव्हान उभे करेल, याचा अभ्यास सुरु असल्याचा अभ्यासही करण्यात आला आहे. प्रतिनिधी
चौकट
2012 मध्ये स्वबळावर निवडून आलेल्या 12 पैकी चार विद्यामान नगरसेवक यावेळेसही स्वबळावरच नशीब आजमावणार आहेत. उर्वरीतपैकी तीन भाजपा, दोन शिवसेनेत आणि एकाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी ब-याच वेळा संधी नसते. याउलट कोणत्या पक्षाशी संबंध नाही, हीच त्यांची जमेची बाजू असते. प्रभागात त्यांचा जनसंपर्क तगडा असतो. त्यामुळे मतदारही अशा उमेदवाराला प्राधान्य देतात.
कुलाबामधून मकरंद नार्वेकर, अंधेरी पश्चिममधून विष्णू गायकवाड, मालाड पश्चिम येथून िसरील िडसोजा अपक्ष लढणार आहेत.
यावेळेस सर्वच मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची संख्याही अधिक असणार आहे.
नागरिकांचा उमेदवार ही संकल्पना गेल्या निवडणुकांतून पुढे आली. यास मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिल्याने. यावेळेसही नागरिकांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
2007 च्या निवडणुकीत नागरिकांचा उमेदवार म्हणून निवडून येणारे अडॉल्फ डिसोजा हे पहिले नगरसेवक होते.
चेंबूर, गोवंडी, विलेपार्ले आणि जुहू येथून स्थानिक नागरिक आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत.